शेतकऱ्यांनो... पेरणी कधी कराल?; अकोला कृषी विद्यापीठाने दिला महत्वाचा सल्ला

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे कृषी विद्यापीठाचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांनो... पेरणी कधी कराल?; अकोला कृषी विद्यापीठाने दिला महत्वाचा सल्ला
Farmers Sowing Saam TV

मुंबई : जून महिना निम्मा संपत आला तरी, अद्यापही मान्सून हवा तसा महाराष्ट्रात स्थिरावलेला नसल्याचं चित्र आहे. ढगाळ वातावरण निर्माण होत आहे, सोसाट्याचा वाराही सुटत आहे, पावसासाठी पूरक वातावरणही तयार असूनही पावसाच्या सरी काही बरसताना दिसत नाहीत. थोडक्यात काय, तर यंदाचा मान्सून लांबला नसला, तरीही त्याचा वेग मात्र मंदावल्याचं स्पष्ट होत आहे. अशातच शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करायला नको असा सल्ला अकोल्यातील कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना दिला आहे.

Farmers Sowing
सोन्याची अंगठी मागितली म्हणून प्रियकरानं आवळला प्रेयसीचा गळा; सांगलीतील धक्कादायक घटना

पावसाचे उशिरा होणारे आगमन, पाऊस आल्यानंतर पडणारा खंड यामुळे पेरणी व पिके वाया जाऊन श्रम आणि आर्थिक फटका शेतकरी बांधवांना बसतो. त्यामुळे पेरणीची घाई करू नये, असा सल्ला अकोल्यातील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना दिला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता 80 ते 100 मिमी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये. असं कृषी विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे.

Farmers Sowing
ATM मध्ये तांत्रिक बिघाड; पाचशेचा विड्रॉल, निघाले अडीच हजार; पैसे काढण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी

येत्या 2 दिवसांत राज्याच्या अनेक भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. एकीकडे पावसानं तग धरलेला नसताना, वरुणराजा स्थिरावल्याशिवाय पेरणीची घाई करू नका, असा मोलाचा सल्ला हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.

अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. पुरेसा पाऊस झाल्यास खंड पडला तरी पीक तग धरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे कृषी विद्यापीठाचे म्हणणे आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com