Good News - शेतकऱ्यांना अवजारे अनुदानावर मिळणार..

Good News - शेतकऱ्यांना अवजारे अनुदानावर मिळणार..
Farmers to Get Farm equipments on Grant Say Dada bhuse

मुंबई : कृषि विद्यापीठांनी विकसित केलेले कृषी यंत्र व अवजारांचे उत्पादन करण्यासाठी खासगी उत्पादकांची नियुक्ती करणे, त्याचबरोबर खासगी उत्पादकांनी विकसित केलेल्या नावीन्यपूर्ण यंत्रे व अवजारांचा राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. Farmers-to- get -Farm- Equipment- on -Grant -Announced-Dada-Bhuse 

निवड झालेली अवजारे महा-डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करून दिली जातील. यासंदर्भात प्रक्रिया निश्चित करण्याबाबत निर्णयही जाहीर करण्यात आल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

हे देखिल पहा

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमार्फत विविध स्वरूपाची व नावीन्यपूर्ण यंत्रे व अवजारे विकसित केली आहेत. मात्र त्यांचे विद्यापीठांमार्फत मोठ्या प्रमाणात व्यावसायिक उत्पादन करण्याच्या मर्यादा येतात. त्या लक्षात घेता त्याचा लाभ शेतकऱ्यांना देता येत नाही. खासगी उत्पादकांनी देखील अनेक नावीन्यपूर्ण यंत्रे व अवजारे विकसित केलेली आहेत परंतु, त्यांचा योजनेत समावेश नसल्यामुळे ती शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध होत नाहीत. यासाठी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेत त्याचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे भुसे यांनी सांगितले. Farmers-to- get -Farm- Equipment- on -Grant -Announced-Dada-Bhuse 

सांगली महापालिकेकडून आपत्तीपूर्व तयारीला वेग

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी...
- निवड प्रक्रियेसाठी कार्यपद्धती निश्चित
- कृषी विद्यापीठाने विकसित केलेली व संयुक्त कृषी संशोधन समितीने शिफारस केलेली कृषी यंत्रे व अवजारे खासगी उद्योजकांमार्फत उत्पादित करण्यासाठी प्रत्येक कृषी विद्यापीठस्तरावर एक तांत्रिक समिती स्थापन करण्यात
- तांत्रिक समितीमार्फत उत्पादकांच्या पात्रतेचे निकष व स्वामित्व धनाची रक्कम निश्चित करणार
- अनुदान निश्चितीसाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार
- समितीच्या मान्यतेनंतर ही अवजारे महा-डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करून दिली जातील

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com