जमिनीचा पोत बिघडला; शेतकऱ्यांचे माती परीक्षणाकडे दुर्लक्ष

उस्मानाबाद जिल्ह्यात तब्बल साडेतीन लाख शेतकरी आहेत. तर पाच लाख 27 हजार हेक्टर वरती पीक उत्पादन घेतलं जातं.
Osmanabad News
Osmanabad NewsSaam Tv

कैलास चौधरी

उस्मानाबाद - शेतातील उत्पन्न घटण्याठी विविध कारणे आहेत त्यातील प्रमुख कारण म्हणजे आपल्याला जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण किती हे माहिती नसणे वर्षानुवर्षे रासायनिक खतामुळे जमीन नापीक होत चाललेली आहे. तर दुष्काळ (Drought) आणि अतिवृष्टीने जमिनीचा पोत खराब होतो आहे. मात्र तरी ही शेतकऱ्यांचे (Farmer) आणि प्रशासनाचे माती परीक्षण लाकडे दुर्लक्षच आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात तब्बल साडेतीन लाख शेतकरी आहेत. तर पाच लाख 27 हजार हेक्टर वरती पीक उत्पादन घेतलं जातं. मात्र यातील बहुतांश शेतकऱ्यांनी अद्याप एकदाही माती परीक्षण करून घेतलं नाही. त्यात काही बागायतदार शेतकरी आहेत ज्यांनी काही प्रमाणात आपल्या मातीचा पोत सुधारण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, वर्षभरात केवळ 9 हजार 124 शेतकऱ्यांनीच माती परीक्षण करून घेतले आहे.

हे देखील पाहा -

महाराष्ट्रात खडकांपासून काळी माती बनण्याचे प्रमाण अधिक आहे. जमिनीमध्ये नत्र,स्फुरद आणि पालाश ह्या घटकाचे प्रमाण कमी-अधिक प्रमाणे आहे. काही ठिकाणी पालाश भरपूर आढळतो तर स्पुरसचे प्रमाण अत्यंत कमी आहे. तर मध्यम स्वरूपात नत्र आहे. शेतकऱ्यांनी शेतीचे योग्य तपासणी केली आणि या प्रत्येक घटकांचे माहिती जाणून घेतली तर जमिनीची पोत सुधारण्यास मदत होते. तर उत्पादन वाढीत भर पडते मात्र यातील बहुतांश शेतकऱ्यांना तपासणी केली जाते आणि करावीच लागते याची माहिती नाही तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी तपासणी केली मात्र अहवालच मिळाला नसल्याचे तक्रारी केल्या जातात.

Osmanabad News
राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार? चंद्रकांत पाटील म्हणतात...

भौगोलिक अंतरामुळे देखील शेतकऱ्यांना माती परीक्षण करण्यासाठी शक्य होत नाही जिल्ह्यात माती परीक्षणाच्या चार लॅब आहेत. दोन खाजगी तर दोन सरकारी. मात्र, तरीदेखील माती परीक्षण करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अगदी बोटावर मोजण्याइतकी त्यातही उमरगा, लोहारा, भूम, परंडा या तालुक्यातील शेतकरी माती परीक्षण कडे वळले नाहीत. शेतात पेरणी केली की खाताचा दुकानातून वेगवेगळ्या कंपनीचे ब्रांडेड खते खरेदी केली जातात जमिनीला आवश्यक नसणाऱ्या खतांचा मारा पिकांवरती आणि जमिनीवर केला जातो. त्यामुळे उत्पन्नात घट होते. चार लॅब मधून साधारण दिवसाला 50 सॅम्पल घेण्याची क्षमता आहे. यासाठी 35 रुपयांची फीस आहे. मात्र लॅब आणि शेतकरी यांच्यातील अंतर मोठे आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com