पंचनामे करता येणार नाहीत, शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या; धनंजय मुंडेंची मागणी

चक्रीवादळ,सांगली-कोल्हापूरचा पूर त्यापेक्षाही वाईट परिस्थिती आता मराठवाड्यात आहे.
धनंजय मुंडे
धनंजय मुंडे SaamTV

रश्मी पुराणीक

मुंबई : मराठवाड्यासह विदर्भातीन Marathwada Vidarbh अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मी मुख्यमंत्र्यांना काल जी परिस्थिती आहे ती निदर्शनास आणून दिली आहे. कोल्हापूर सांगली पेक्षा भयंकर प्रकार मराठवड्यात झाला आहे. अचानक आलेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरलेलं नाही. त्यामुळे सध्या तरी शेतीचे पंचनामे करता येणं शक्य नाही तरी शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी मागणी बीडचे पालकमंत्री तसेच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे Dhanajay Mundhe यांनी केली आहे. (Farmers should be helped)

हे देखील पहा -

धनजंय मुंढे नी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला असून त्यांनी हे संकट राज्यात याआधी आलेल्या आपत्तींपेक्षा मोठे असल्याचे सांगितले आहे. यापुर्वी येवून गेलेले चक्रीवादळHurricane,सांगली-कोल्हापूरचा Sangli-Kolhapur पूर त्यापेक्षाही वाईट परिस्थिती आता मराठवाड्यात आहे. त्यामुळे पंचनामे होऊच शकत नाही एकाच पिकावर चार वेळा अतिवृष्टी Heavy rain झाली असून सरसकट मदत दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि या मागणी संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना CM भेटून मागणी करणार असल्याच त्यांनी जाहीर केलं आहे.

धनंजय मुंडे
दुर्देवी : सोयाबीन तोडणीसाठी जाणाऱ्या मजुरांचा टेम्पो उलटला; एक महिला ठार १० जखमी

दरम्यान त्यांनी पंकजा मुंढेच्या Pankja Mundhe टीकेला उत्तर देखील दिलं आहे. बीड मध्ये अकरा वेळी ढगफुटी झाली तेव्हा आम्हीच शेतकऱ्यांच्या बांधावर होतो. आम्ही रात्रभर जागून काढल्या, 124 लोक वस्तीत अडकलो त्यांना बाहेर काढले मात्र त्याच अनेक दिवस अमेरिकेत Americaगायब होत्या आणि मी अशा टीकेचा विचार करत नसल्याचही ते यावेळी म्हणाले. बीड मध्ये संकट आले असताना पालकमंत्री कुठे गायब आहेत अशा प्रकारची टीका पंकजा मुंढेसह भाजप कडून राज्य सरकार मधील पालकमंत्र्यांवरती करण्यात आली होते त्यावर धनंजय मुंढेनी आपली प्रतिक्रीया दिली.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com