शेतीचे पंचनामे होऊनही मदत नाही; बळीराजा आता हवालदील
शेतीचे पंचनामे होऊनही मदत नाही; बळीराजा आता हवालदीलराजेश काटकर

शेतीचे पंचनामे होऊनही मदत नाही; बळीराजा आता हवालदील

परभणीचे पालक मंत्री नवाब मलिक यांनी अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली. मात्र अद्यापही मदत न मिळाल्याने बळीराजा आता हवालदिल झाला आहे.

परभणी: परभणीचे पालक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई येथून अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याची सूचना महसूल अधिकाऱ्यांना दिली. मात्र जिल्ह्यात अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मलिक यांनी स्वतः परभणीला येणे टाळले आणि यावरूनच आता भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी पालकमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. (Farmers waiting for help in Parbhani despite panchnama)

हे देखील पहा -

परभणी जिल्ह्यात ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही अतिवृष्टी झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. ऑगस्टमध्येही पंचनामे करण्यात आले, मात्र मावेजा देण्यात आला नाही. तसेच आताही अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना पालक मंत्र्यांनी दिली. त्यामुळे प्रत्यक्षात मदत कधी भेटेल, असा प्रश्न या निमित्तानं भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी उपस्थित केला. राज्य शासनाकडून लवकरच मदत जाहीर करण्यात आली नाही तर भाजपकडून मोठा लढा उभारणार असल्याचे यावेळी मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केले.

शेतीचे पंचनामे होऊनही मदत नाही; बळीराजा आता हवालदील
यवतमाळमधील हिंदु-मुस्लीम बांधव एकत्र मिळून करतायत बाप्पाची आराधना

दरम्यान, सलग दोन महिन्यात दोन वेळा अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचाही आता संयम संपला आहे. शासनाने लवकरात-लवकर थेट मदत जाहीर करावी आता पंचनामे करण्याच्या भानगडीत पडू नये अशा भावना शेतकरी वर्गातून व्यक्त केल्या जातायत. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये सलग दोन वेळा अतिवृष्टीचा सामना करणारा बळीराजा आता हवालदिल झाला आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com