उदगीर रेल्वे स्टेशनवर आता खते-बियाणांसाठी मालधक्का; फर्टिलायझर रॅक पॉईंटला मंजुरी

उदगीरच्या स्टेशनवर रॅक पॉईंट मिळावा ही गेल्या अनेक दिवसांची मागणी होती.
Latur News
Latur NewsSaam Tv

उदगीर - खते आणि बी-बियाणे उतरविण्यासाठी उदगीरच्या रेल्वे स्टेशनवर रॅक पॉईंट देण्यात यावा अशी अनेक शेतकरी (Farmer) आणि व्यापाऱ्यांची मागणी होती. या मागणीला आता यश प्राप्त झाले असून उदगीर स्टेशनवर खते आणि बियाणे उतरविण्यासाठी पॉईंट सुरू करण्याची परवानगी केंद्र सरकारच्या (Central Government) खते वाहतूक विभागाने दिली आहे.

हे देखील पाहा -

उदगीरच्या स्टेशनवर रॅक पॉईंट मिळावा ही गेल्या अनेक दिवसांची मागणी होती. ही मागणी पूर्ण झाल्याने वाहतुकीच्या खर्चात कपात होऊन शेतकऱ्यांना कमी दरात खते आणि बियाणे मिळणार आहेत. उदगीर रॅक पॉईंट वरून आणखी आयात आणि निर्यात वाढली तर रेल्वे प्रशासन नवीन ट्रक उभा करू शकते, त्यामुळे उदगीर परिसरातल्या व्यापारी उद्योजकांना या रॅक पॉईंटचा फायदा होणार आहे.

Latur News
धक्कादायक! विम्याचे १ कोटी मिळविण्यासाठी सुपारी देऊन पतीची हत्या

शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून खासदार- सुधाकर शृंगारे यांनी उदगीर स्टेशनवर खते आणि बियाणे रेल्वेने मागवण्याची आणि उतरविण्याची मागणी केली होती. त्यावरून केंद्र सरकारच्या खते वाहतूक विभागाने रॅक पॉईंटची उदगीरला मंजुरी दिली आहे. या रॅक पॉईंटमुळे उदगीर आणि परिसरातल्या शेतकऱ्यांना कमी दरात खते-बियाणे मिळण्यास मदत होणार आहे. राज्यात मंजूर करण्यात आलेल्या रॅक पॉइंट मध्ये उदगीर आणि चांदूर बाजार या शहराचा समावेश आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com