Drought Condition In Solapur : बळीराजानं सात एकर सोयाबीन पिकावर फिरवला रोटर; तूर, उडीद, मूग पिके लागली जळू

साेलापूर जिल्ह्यावर पिण्याच्या पाण्याचे देखील संकट उभं ठाकलं आहे.
Solapur News, drought condition in solapur
Solapur News, drought condition in solapursaam tv

Solapur News : सोलापूर जिल्ह्यावर यंदा दुष्काळाचे ढग दाटून आले असून निम्मा पावसाळा संपला तरी अजूनही बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाविना पिक पिवळी पडत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यावर दुबार पेरणीच संकट आले आहे. दरम्यान पाऊस पडत नसल्याने एका शेतका-याने सात एकर सोयाबीनवर रोटर फिरवल्याची घटना घडल्याचे समाेर आले आहे. (Maharashtra News)

Solapur News, drought condition in solapur
Teachers Day दिवशी महाराष्ट्रातील लाखाे शिक्षक जाणार सामूहिक रजेवर; जाणून घ्या नाराजीचे कारण

सोलापूर जिल्ह्यातील भीमा, सीना, नीरा, मान या नद्यांची पात्र कोरडी पडू लागली आहेत. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही सोलापूरकरांना भेडसावतो आहे. प्रशासनाने याची योग्य ती दखल घ्यावी अशी मागणी जोर धरत आहे.

Solapur News, drought condition in solapur
108 Ambulance Drivers Call Strike : 'बीव्हीजी' ने शब्द पाळला नाही, 108 आरोग्य सेवा रुग्णवाहिका चालक निघाले संपावर

पावसाळ्याच्या मध्यावर दोन महिन्यांनंतर थोडासा पाऊस पडला. त्या पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या नंतर पावसाने मोठा खंड दिल्याने सोयाबीन, तूर, उडीद, मूग ही पिके जवळपास गेल्यात जमा आहेत.

आता दिवस पुढे आल्याने दुबार पेरणी होणे देखील अवघड आहे. त्यात पाऊसही पडेना म्हणून वैतागून सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील राळेरास येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सोयाबीन पिकावर रोटर फिरवून आपला संताप व्यक्त केला आहे.

Solapur News, drought condition in solapur
Sachin Tendulkar ने नाेटीसीचे उत्तर न दिल्यास..., Bacchu Kadu यांचा प्लॅन तयार (पाहा व्हिडिओ)

पावसाने मोठ्या प्रमाणात खंड दिल्याने खरीप हंगामातील ही पिके पावसाअभावी जवळपास वाया गेली आहेत. सध्याचा काळ हा फुले लागण्याचा काळ असून या काळातच जर पाऊस नसेल तर हिरव दिसत असलेले आणि सुकलेले पण त्याला शेंगा येऊ न शकणारे सोयाबीन शेतात ठेवण्यात काय अर्थ.

पुढे पाऊस पडला तर रब्बी हंगामात काही तरी करता येईल. यामुळे वैतागून बार्शी तालुक्यातील शेतकरी संतोष शेरखाने यांनी दोन एकर, बालाजी ढवळे यांनी तीन एकर तर गणेश प्रतापराव पाटील यांनी दोन एकर क्षेत्रावरील सोयाबीन पिकावर रोटर फिरवून निसर्ग आणि शासनाप्रती आपली नाराजी व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com