मेथी १३० रुपयाला; गृहिणींना फुटला घाम

मेथी १३० रुपयाला; गृहिणींना फुटला घाम
मेथी

हिंगोली : सप्टेंबर महिन्यात आलेल्या महापुराच्या संकटाने शेकडो हेक्टरवरील भाजीपाला लागवड शेती उध्वस्त झाली आहे. याचा फटका आता सर्वसामान्य ग्राहकांना बसू लागला आहे. हिंगोलीत अचानक भाजीपाल्याचे दर कडाडू लागले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट काेलमडत आहे. fenugreek-cost-130-rupeess-kilogram-maharashtra-hingoli-news-sml80

मेथी
पैशाच्या जोरावर भाजप जिंकली; अब्दुल सत्तार

हिंगोली शहरातील भाजी मंडईत किरकोळ विक्री होणारी गोबी, मेथी, कारले ,दोडके या सह कोथिंबीर देखील महागली आहे. दरम्यान सर्वाधिक दर मेथीच्या भाजीचा आहे. एरव्ही जुडीने विक्री होणारी मेथीची भाजी आज तब्बल १२० ते १३० रुपये किलो दराने विक्री केली जात हाेती.

सप्टेंबर महिन्यातील पावसामुळे भाजीपाला लागवड उद्धवस्त झाली. घाऊक बाजारात भाजी मिळत नाही. त्यामुळे इकडून तिकडून पण खरेदी करावी लागत आहे. त्याचा परिणाम दरावर हाेत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. एकीकडे स्वयंपाकाचा गॅस महागात आहे तर दूसरीकडे भाज्या यामुळे गृहिणींचे आर्थिक कुचंबणा हाेत आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.