ताप वाढला; २० शेळ्यांच्या मृत्यूनं पशुसंवर्धन विभागानं उचलली ठाेस पावलं

या घटनेमुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे.
sheep , khed , pune, animal husbandary department , lampi virus
sheep , khed , pune, animal husbandary department , lampi virussaam tv

Khed News : राज्यभरात गाई, बैलांमध्ये लम्पी स्किनचं संक्रमण होऊन जनावरांच्या मृत्युचे प्रमाण वाढत आहे. त्यातच आता खेड तालुक्यातील खरपुडी येथे २० शेळ्यांचा (sheep) दुदैवी मृत्यु झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे मेंढपाळांसह शेतक-यांमध्ये (farmers) भितीचे वातावरण पसरलं आहे.

खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथील मेंढपाळ सर्जेराव बरबटे यांच्या शेळ्यांमध्ये मागच्या आठ दिवसांत विविध आजार आढळुन आला आहे. तब्बल २० शेळ्यांचा मृत्यु झाल्याची धक्कादायक बाब देखील समोर आली आहे.

तब्बल २० शेळ्यांच्या अचानक मृत्युमुळे पशुसंवर्धन विभाग देखील खडबडुन जागं झाले आहे. शेळ्यांच्या मृत्यु झाल्यानंतर अधिकारी शेळ्यांच्या गोठ्यावर जाणार आहेत. शेळ्यांमध्ये तापाचे प्रमाण दिसुन येत असुन शेळ्यांचे तातडीने शवच्छेदन करण्यात येणार आहे. शवच्छेदनाच्या अहवालानंतर शेळ्यांच्या मृत्युच नेमकं कारण समोर येईल अशी माहिती पशुवैद्यकीय आधिकारी योगेश शेळकेंनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

sheep , khed , pune, animal husbandary department , lampi virus
कार्यवाही सुरु; ३५० शिक्षकांसह मुख्याध्यापकांना नाेटीसा, गट शिक्षणाधिकारीही अडचणीत

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com