बोगस खरेदीखत प्रकरणी; देवणीचे दुय्यम निबंधकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल...

बोगस खरेदीखत केल्या प्रकरणी देवणीचे दुय्यम निबंधक यांच्यासह ४ जणांविरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी देवणी यांच्या आदेशानुसार देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बोगस खरेदीखत प्रकरणी; देवणीचे दुय्यम निबंधकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल...
बोगस खरेदीखत प्रकरणी; देवणीचे दुय्यम निबंधकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल...दीपक क्षीरसागर

लातुर : लातुर जिल्ह्यातील देवणी तालुक्यामधील धनगरवाडी, जवळगा या ठिकाणी शेत जमीनीचा दुसराच व्यक्ती उभा करून, बोगस खरेदीखत केल्या प्रकरणी देवणीचे दुय्यम निबंधक यांच्यासह ४ जणांविरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी देवणी यांच्या आदेशानुसार देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

यामध्ये फिर्यादी हिचे वडील राजाराम नागप्पा काकनाटे हे दिनांक १२ एप्रिल २०२१ दिवशी बालाजी हॉस्पिटल वलांडी या ठिकाणी अॅडमीट असताना चौघे आरोपी फौजदारीपात्र कट करुन आणि संगणमत करुन, फिर्यादीचे वडीलांचे जमीन सर्वे नं.१२४/२ मध्ये फिर्यादीचा हिस्सा आहे. हे माहीत असताना तरीदेखील अज्ञात व्यक्तीला राजाराम या नावानी उभा करून, सदर जमिनीचे दुय्यम निबंधक कार्यालय देवणी या ठिकाणी खोटे व बोगस खरेदीखत तयार करुन ते खरे म्हणुन वापरले आहे.

बोगस खरेदीखत प्रकरणी; देवणीचे दुय्यम निबंधकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल...
Fire : पवईच्या साकी विहार रोडवर ह्युंदाईच्या सर्व्हिस सेंटरला भीषण आग...(पहा व्हिडिओ)

या प्रकरणी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी देवणी यांचे आदेशान्वये कलम १५६(३) सी.आर.पी.सी प्रमाणे मिनाक्षी धनाजी बोडके राहणार धनगरवाडी, जवळगा यांच्या फिर्यादीवरून देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार रामदास नामदेव काकनाटे, हरि व्यंकटराव मेळकुंदे, पांडुरंग बापुराव चिंचोले, प्रमोद येशमवार दुय्यम निबंधक देवणी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com