अखेर विदर्भात शेतकरीवर्ग सुखावला
अखेर विदर्भात शेतकरीवर्ग सुखावलाSaam Tv

अखेर विदर्भात शेतकरीवर्ग सुखावला

संपूर्ण जून महिना प्रतिक्षेत गेल्याने कालपासून नागपूर आणि विदर्भात पावसाला सुरूवात झाली आहे.

नागपूर : संपूर्ण जून महिना प्रतिक्षेत गेल्याने कालपासून नागपूर Nagpur आणि विदर्भात Vidarbha पावसाला Rain सुरूवात झाली आहे. रोवणीसाठी खोळंबलेल्या शेतकऱ्यांनी अखेर सुटकेचा श्वास घेतला आहे. मात्र, रात्रभरापासून सुरू असलेल्या, आणि सौम्य स्वरुपात कोसळणाऱ्या पावसाने पहाटे तीव्र रूप धारण केल आहे. Finally started raining in Vidarbha

नागपूर, भंडारा Bhandara, वर्धा, गोंदिया, अमरावती Amravati जिल्ह्यांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा देखील खंडित करण्यात आला आहे. काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. उन्हाळा चांगलाच तापत गेला होता. कोवळी पिके माना टाकत असल्याने, शेतकरी Farmers घायकुलीला आला होता. पण काल सायंकाळी विजेच्या कठाक्यात आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

हे देखील पहा-

पाऊस बरसल्याने, शेतकरी आनंदून गेला आहे. पिकांना पाणी मिळाल्याने, दुबार पेरणीचे संकट टळल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. सकाळी थांबलेला पावसाने आजून परत सुरूवात केली आहे. दोन आठवड्यामध्ये पावसाला उघाड दिले होते. सेवाग्राम व परिसरातील शेतकरी नव्हे तर नागरिकही असह्य उन्हाळा व गर्मीमुळे त्रस्त झाले होते. Finally started raining in Vidarbha

अखेर विदर्भात शेतकरीवर्ग सुखावला
जालन्यात चक्रीवादळासह गारांचा पाऊस; शेतीचे मोठे नुकसान

कायम घामाच्या धारा वाहत असल्याने‌, पावसाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पाऊस पडावा याकरिता देवाला‌ साकडे देखील घालण्यात आले होते. डी धोंडी पाणी दे असे म्हणत काही गावाला प्रदक्षिणा देखील घालण्यात आले होते. सर्वांचेच लक्ष‌ ढगांकडे लागले होते. शेतकऱ्यांना तर दुबार पेरणी करावी‌ लागणार‌ याची चिंता भासू लागली होती. यातून आर्थिक घडी नक्कीच विस्कटविणारी आहे. बुधवार सायंकाळीपासून सुरू झालेला, पाऊस आज सकाळपर्यंत कायम असल्याने शेतकरी आणि नागरिक भाराहून गेले आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com