समुद्रपुर बाजार समितीच्या गोडाऊनला आग; लाखोंचा बारदाना जळून खाक!

२५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान
समुद्रपुर बाजार समितीच्या गोडाऊनला आग; लाखोंचा बारदाना जळून खाक!
Fire at samudrapur apmcsaamtvnews

वर्धा : समुद्रपुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Samudrapur APMC) गोडाऊनला अचानक लागलेल्या आगिमध्ये गोडाऊनमध्ये असलेला लाखो रूपयांचा बारदाना (Bardana Bags) जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. नाफेडच्या (NAFED) शासकीय योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून हरभराखरेदी करता कृषी उत्पन्न बाजार समितीने बारदाना खरेदी केला होता व तो बारदाना येथील गोडाऊनमध्ये सुरक्षितरित्या ठेवला देखील होता.

हे देखील पहा :

मात्र, आज अचानक आग लागल्याने तो बारदाना जळून पूर्णपणे खाक झाला आहे. सदर बारदाण्याच्या एकुण ८० गाठी असल्याचे समजते व त्यांची अंदाजे किंमत जवळपास २५ ते ३० लाख रुपये आहे. त्याचप्रमाणे तिथे काही प्रमाणात शिल्लक असलेला बारदाना सुद्धा जळून खाक झाला आहे. तसेच या आगीत इमारतीचे (Building) देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.

Fire at samudrapur apmc
RTO च्या चालकासह १ महिला ठार, ६ जखमी; गाय आडवी आल्याने झाला अपघात

गोडाऊनला (Godown) लागलेल्या आगीने रौद्र रुप धारण केले होते. तरी नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी जवळच असलेले बोरवेल पाईप लावून नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लगेचच समुद्रपूर येथील नगरपंचायतचे पाण्याचे टँकर बोलावून आगीवर पाण्याचा मारा केल्याने आग आटोक्यात आली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com