शेतीच्या वादातून पाच जणावर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील शेतीच्या वादातून केळगाव येथे पाच जणावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असून आरोपींना अटक झालेली नाही.
शेतीच्या वादातून केळगावात पाच जणावर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
शेतीच्या वादातून केळगावात पाच जणावर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल दीपक क्षीरसागर

दीपक क्षीरसागर

लातूर : लातूर Latur जिल्ह्यातील निलंगा Nilanga तालुक्यातील शेतीच्या वादातून केळगाव येथे पाच जणावर ऍट्रॉसिटीचा Atrocity गुन्हा दाखल झाला असून आरोपीना अटक झाली नाही. Five persons have been charged with atrocities in Kelgaon over an agricultural dispute

निलंगा तालुक्यातील केळगाव येथील शेतशिवारातील गट क्रमांक ५३ अ मधील रस्त्यावर लक्ष्मीबाई शञूघन कांबळे, पुजा लखन कांबळे, लखन लहू कांबळे, भिवा लखन कांबळे यांना १ जुलै रोजी सांयकाळी चार वाजण्याच्या सुमारास आरोपी लक्ष्मण ज्योतिराम पाटील, किशन रमेश पाटील, जागृती लक्ष्मण पाटील, मिरा रमेश पाटील, सुक्षंतबाई ञ्यंबक पाटील या पाच जणांनी हे शेत आमचे आहे तुम्ही आमच्या शेतातून तुम्हाला जायला वाट नाही असे ते म्हणाले होते.

हे देखील पहा -

आमच्यावर मागे तुम्ही अट्रासिटीचा गुन्हा का दाखल केला म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली अशी माहिती आहे. तसेच लाथा चापटानी मारहाण करून जखमी केले आहे. तसेच पाच वर्षाच्या बालकाला सुध्दा मारहाण करून जखमी केले आहे. अशी फिर्याद निलंगा पोलिस ठाण्यात शञूघन लहू कांबळे यानी दिली असून पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल कराण्यात आला आहे.

शेतीच्या वादातून केळगावात पाच जणावर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
बंडातात्या कराडकर यांना फलटणला नेले?

शेतीच्या वादाच्या कारणावरून वरील पाच जणांनी मारहाण केल्याने निलंगा पोलिसात Police गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल चोरमले हे करत आहेत.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com