
सांगली जिल्ह्यातील जवळ जवळ सर्रास द्राक्ष बागांची छाटणी रखडली आहे. गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या रिमझिम पाऊस (rain) व ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष छाटणी रखडल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. डिसेंबर ते जानेवारीपर्यंत पावसाचा अंदाज असल्याने द्राक्ष बागायतदारांपुढे पुन्हा संकट निर्माण झाले आहे.
सांगली जिल्ह्यात द्राक्ष पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष छाटणी रखडली आहे. त्यातच डिसेंबर ते जानेवारीपर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने यावर्षीही द्राक्षबागांच्या पीक छाटण्या लांबण्याची शक्यता आहे. द्राक्ष बागायतदारांची सप्टेंबरमध्ये छाटण्या घेऊन धोका पत्करण्याची मानसिकता राहिलेली नाही. द्राक्षशेती हळूहळू आणखी संकटात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांनी द्राक्षशेतीत चांगली प्रगती केली आहे. मात्र गेल्या तीन - चार वर्षांपासून अडचणीत आली आहे. द्राक्ष बागांमध्ये अद्यापही पीक छाटणी सुरू नाही. दलालांकडून लुबाडणूक , द्राक्षाला अपेक्षित दर न मिळणे , लहरी हवामान आणि गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनचा फार मोठा फटका द्राक्ष बागायतदारांना बसला आहे. शासनाने द्राक्ष बागायतदारांना आर्थिक सहाय्य करावे, कर्जाचे व्याज माफ करावे, औषधे, खते यांचे दर कमी करावेत अशी मागणी होत आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.