मुसळधार पावसाने अमरावतीतील जनजीवन विस्कळीत; शेतीचे प्रचंड नुकसान

मागील दोन- तीन दिवसांतील जोरदार पावसामुळे अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली
मुसळधार पावसाने अमरावतीतील जनजीवन विस्कळीत; शेतीचे प्रचंड नुकसान
मुसळधार पावसाने अमरावतीतील जनजीवन विस्कळीत; शेतीचे प्रचंड नुकसानअरुण जोशी

अमरावती : मागील दोन- तीन दिवसांतील जोरदार पावसामुळे अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली असून, शेतीलाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. १४ पैकी ६ तालुक्यात शेतीचे नुकसान झाले आहे. चांदूरबाजार वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये घरांची पडझड झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील ८८० हेक्टर शेती खराब झाली आहे. तर ३६९ घरांची पडझड झाली आहे.

यापैकी ९ घरे पूर्णत: पडली असून ३६० घरांचे नुकसान झाले आहे. शेतीचे सर्वाधिक नुकसान दर्यापूर तालुक्यात झाले आहे. या तालुक्यातील ५५५ हेक्टर मधील पीक खराब झाले आहे. त्या खालोखाल १२० हेक्टर शेती पिके धामणगाव रेल्वे तालुक्यात खराब झाली आहेत. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ९२, तर वरुड तालुक्यातील ७८, मोर्शी तालुक्यातील २० आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यातील १५ हेक्टर मधील शेतीपिके मोठ्या प्रमाणात खराब झाली आहेत.

हे देखील पहा-

अशाप्रकारे जिल्ह्याच्या ६ तालुक्यातील ८८० हेक्टर मधील पिके मोठ्या प्रमाणात खराब झाली आहेत. मागील चार दिवसांपासूनच्या पावसामुळे जिल्ह्यातील १२१ गावांमध्ये कहर झाला आहे. धामणगाव रेल्वे, भातकुली आणि तिवसा तालुक्यातील अनुक्रमे २७,२३ आणि २२ गावांमध्ये पावसाने अक्षरश: मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. यामुळे अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी नोंद करण्यात आली आहे.

मुसळधार पावसाने अमरावतीतील जनजीवन विस्कळीत; शेतीचे प्रचंड नुकसान
मुसळधार पावसाने धुळेही जलमय; घरांमध्ये साचले गुडघाभर पाणी

या अतिवृष्टीमुळे ३६९ घरांची पडझड झाली. यापैकी अमरावती आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील प्रत्येकी तीन तर वरुड, दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यातील प्रत्येकी एक अशाप्रकारे ९ घरे पूर्णत: कोलमडली आहेत. तर ३६० घरांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. फटका बसलेल्यांमध्ये सर्वाधिक ८७ घरे तिवसा तालुक्यातील असून भातकुली तालुक्यातील ७६, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ५१, तर अमरावती तालुक्यातील ४९ आणि दर्यापूर तालुक्यातील ३३ गावांचा समावेश करण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com