Beed : वादळी वाऱ्यामुळे फळबाग भुईसपाट; मायबाप सरकारने नुकसान भरपाई द्यावी, शेतक-याची आर्त हाक

आमच्यासमोर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही असे शेतकरी म्हणून लागले आहेत.
Beed : वादळी वाऱ्यामुळे फळबाग भुईसपाट; मायबाप सरकारने नुकसान भरपाई द्यावी, शेतक-याची आर्त हाक
beed, rain, farmer, mango treesaam tv

बीड : बीड (beed) जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पहिल्याच पावसाने (rain) शेतकऱ्याच्या (farmer) फळबागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या 15 वर्षापासून संभाळलेली फळबाग उन्मळून पडल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. (beed latest marathi news)

बीडच्या आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक परिसरात दाेन दिवसांपूर्वी माेठा पाऊस झाला. यादरम्यान पावसापेक्षा जोरदार वादळी वारे आल्याने डाळिंब, आंबा, लिंबूनी आदी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी गोकुळ वाघुले यांनी त्यांची फळबाग गेल्या 15 वर्षांपासून जोपासली आहे. भर उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणी आणून प्रत्येक त्यांनी झाड जोपासले. मात्र पहिल्याच पावसात आणि आलेल्या वादळी वाऱ्याने त्यांची फळबाग उध्वस्त झाली आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा मी आत्महत्या करेन असा संतप्त आणि टोकाचा इशारा शेतकरी गोकुळ वाघुले यांनी सरकाराला दिला आहे.

beed, rain, farmer, mango tree
Miraj Crime News : पोलिसांची मिरजेत माेठी कारवाई; पाच युवक अटकेत

दरम्यान बीड जिल्ह्यात दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाने शेतकरी अडचणीत येतो. मात्र यंदा पहिल्याच पावसात आलेल्या वादळी वाऱ्याने तळहाताच्या फोडासारखे जोपासलेली फळबाग नेस्तनाबूत झालीय. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. त्यामुळे मायबाप सरकार आणि शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा आमच्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय नाही असे शेतकरी म्हणून लागले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

beed, rain, farmer, mango tree
WWE चा निर्णय समजताच सुपरस्टार शाशा बॅंकचे चाहते घायाळ
beed, rain, farmer, mango tree
अजिंक्यतारा कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले; प्रशासनासह शेतकरीही खूष
beed, rain, farmer, mango tree
हद्दच झाली राव! खासदार, आमदारांनी बाेलाविलेल्या बैठकीत अधिकारी खेळत हाेते कॅंडी क्रश

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com