अकोला जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी

आज दुपारपासूनच पावसाने जिल्ह्याच्या विविध भागाला झोडपले आहे.
अकोला जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी
अकोला जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरीSaamTv

जयेश गावंडे

अकोला : गेल्या अनेक दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने आज अकोला जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या तर काही भागात तुरळक प्रमाणात पाऊस पडला आहे. Heavy rains in Akola district

हे देखील पहा -

शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने समस्त शेतकऱ्यांना हुलकावणी दिल्याचे चित्र होते. आज दुपारपासूनच पावसाने जिल्ह्याच्या विविध भागाला झोडपले आहे.

अकोला जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी
कारोनाच्या काळात एका शेतकरी मुलाचा मदतीत हात

मात्र जिल्ह्यात अजूनही काही भागात पावसाची प्रतिक्षा आहेच. अकोल्यातील डोंगरगाव, शिसा मासा, बोरगाव आदी परिसरात दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावलीय. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. डोंगरगाव परिसरात पेरणी सुरू असताना पावसामुळे पेरणी बंद करावी लागली तर आज झालेल्या पावसामुळे परिसरातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com