अवकाळी पावसाने बळीराजाच्या अश्रूंचा बांध पुन्हा फुटला; ग्रामीण भागात भात पिकांच्या झोरी पावसाने भिजल्या...
अवकाळी पावसाने बळीराजाच्या अश्रूंचा बांध पुन्हा फुटला; ग्रामीण भागात भात पिकांच्या झोरी पावसाने भिजल्या... प्रदीप भणगे

अवकाळी पावसाने बळीराजाच्या अश्रूंचा बांध पुन्हा फुटला; ग्रामीण भागात भात पिकांच्या झोरी पावसाने भिजल्या...

परतीच्या पावसाने शेतात चिख्खल झाले असतानाही शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी भात पिके कापून घेतली

डोंबिवली : गुरुवारी दुपारच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडवली आहे. परतीच्या पावसाने शेतात चिख्खल झाले असतानाही शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी भात पिके कापून घेतली आहेत. मात्र, असे असताना कल्याण ग्रामीण भागासह मलंगगड भागातील शेतकऱ्यांनी सणासुदीच्या कालखंडात शेतात चिख्खल असल्याने, भाताच्या झोरी तयार करून शेतात ठेवल्या आहेत.

हे देखील पहा-

मात्र मागील २ दिवसांपासून पाऊस ही पडण्याची शक्यता निर्माण केली असताना अचानक गुरुवारी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली आहे. कल्याण ग्रामीण भाग आणि मलंगगड भागातील अनेक गावांमध्ये अचानक गुरुवारी दुपारी पावसाची संततधार सुरु झाली होती. यामुळे शेतकऱ्यांनी घरात असलेल्या प्लॅस्टिकच्या कापडाने भात पिकांना आधार देण्याचे काम केले आहे.

मात्र, घराजवळ असलेल्या शेतकऱ्यांना भात पीक ही पावसापासून भिजवण्यातून काही प्रमाणात यश आले असले, तरी अनेक शेतकऱ्यांची पिके अजून शेतातच आहेत. त्यामुळे पार्टीच्या पावसाने केलेल्या हंगामानंतर आता पुन्हा अवकाळी पावसाने बळीराजावर वक्रदृष्टी दाखवण्यास सुरुवात केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

अवकाळी पावसाने बळीराजाच्या अश्रूंचा बांध पुन्हा फुटला; ग्रामीण भागात भात पिकांच्या झोरी पावसाने भिजल्या...
Pune: तरुणीने ओटीपी शेअर केला अन् पावणे दोन लाखांना बसला फटका

शेतात अनेक ठिकाणी पीक बाहेर काढता येत नसल्याने शेतकऱ्यांनी शेतातच पीक ठेवली आहेत. त्यामुळे अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भाग आणि कल्याण ग्रामीण भागातील १४ गावातील शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान भात पीक वाचवण्याकडे लागले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com