महाबीजच्या MD पदाला लागले ग्रहण; IAS अधिकाऱ्यांना महाबीज नापसंत?

राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ Maharashtra State Seeds Corporation Limited हेआता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या IAS officers 'नापसंती'चे ठिकाण बनले की काय, अशी शंका उपस्थित होत आहे.
महाबीजच्या MD पदाला लागले ग्रहण; IAS अधिकाऱ्यांना महाबीज नापसंत?
महाबीजच्या MD पदाला लागले ग्रहण; IAS अधिकाऱ्यांना महाबीज नापसंत?जयेश गावंडे

राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ Maharashtra State Seeds Corporation Limited हेआता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या IAS officers 'नापसंती'चे ठिकाण बनले की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. महाबीज mahabeej या महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक MD पदावर नेमले जाणारे एमडी हे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी असतात. मात्र हे अधिकारी येथे येण्यास इच्छुकच नसल्याचे वारंवार स्पष्ट होऊ लागले आहे. ias officer doesn't like to work as a md of mahabeez

हे देखील पहा -

तीन महिन्यांपूर्वी आलेले डॉ. राहुल रेखावार dr. rahul rekhawar यांची पुन्हा बदली झाली. त्याआधी डिसेंबर 2020 मध्ये अनिल भंडारी anil bhandari यांची बदली झाल्यानंतर जी. श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हा त्यांनी 17 फेब्रुवारीला महाबीज मुख्यालय गाठले आणि येथील कामकाजाचा आढावा घेतला. नंतर अवघ्या आठवडाभरातच त्यांची नियुक्ती औरंगाबादमध्ये सेल्स टॅक्स विभागात झाली. त्यांच्या जागेवर डॉ. राहुल रेखावार यांची नियुक्ती केली गेली. यालाही आता महिना लोटला होता. दरम्यान याची बातमी साम टीव्हीने दाखवली होती. अखेर 9 एप्रिलला राहुल रेखावार यांनी पदभार स्वीकारला. मात्र नियुक्ती केलेले रेखावार यांची या पदी राहण्याची इच्छा नाही अशी चर्चा महामंडळाच्या मुख्यालयात ऐकायला मिळत होती.

महाबीजच्या MD पदाला लागले ग्रहण; IAS अधिकाऱ्यांना महाबीज नापसंत?
चोरट्यांनी लढवली अनोखी शक्कल ! CCTV मध्ये दिसू नये म्हणून छत्रीचा वापर

अखेर तेच झालं. हंगाम संपण्याच्या आधीच केवळ तीन महिन्यांतच डॉ. राहुल रेखावार यांची कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी पदी बदली झाली. त्यांच्या ठिकाणी अद्यापही कुणाची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या पदाला लागलेले ग्रहण सुटत नाही. महाबीजच्या एमडी पदावर कुणीच येण्यास इच्छुक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. चांगल्या नफ्यात चालणारे हे शेतकऱ्यांचे महामंडळ आयएएस अधिकाऱ्यांना इतके नासपसंतीचे ठिकाण का झाले असावे, याबाबत शेतकऱ्यांमध्येही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com