सोयाबीन पिकावर खोड माशीचा प्रादुर्भाव; उत्पादन घटण्याची शक्यता

सध्या अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असताना आता जिल्ह्यात सोयाबीन पिकांवर विविध किडरोगाचा धोका निर्माण झाला असल्याने बळीराजा हतबल झाला आहे.
सोयाबीन पिकावर खोड माशीचा प्रादुर्भाव; उत्पादन घटण्याची शक्यता
सोयाबीन पिकावर खोड माशीचा प्रादुर्भाव; उत्पादन घटण्याची शक्यतादीपक क्षीरसागर

दीपक क्षीरसागर

लातूर : लातूर Latur जिल्हा हा सोयाबीन Soybean उत्पादनाचं कोठार अशी ओळख राज्यासह देशात आहे. यावर प्रक्रिया उद्योगाची संख्या लक्षणीय आहे. जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी 75 % क्षेत्रात सोयाबीन पिकाचे उत्पादन घेतले जाते. सध्या अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असताना आता जिल्ह्यात सोयाबीन पिकांवर विविध किडरोगाचा धोका निर्माण झाला असल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

लातूर जिल्ह्यात खरिपाच एकूण क्षेत्रापैकी 6 लक्ष 12 हजार 421 हेक्टर पेरणी योग्य क्षेत्रापैकी 4 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली आहे. यासाठी शेतकऱ्यांन महागामोलाची बी बियाणे खते खरेदी करुन मृग नक्षत्रात शेतकर्‍यांनी खरीपाची पेरणी केली मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिव झाले होते. पण या आठवड्यात सतत पाउस rain सुरु असल्याने सोयाबीन सह इतर पिके बहरून आली आहेत.

हे देखील पाहा-

पण सध्या सोयाबीन पिकावर खोडमाशीचा, पाने गुडाळणाऱ्या अंळीचा, गोगल गायीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्‍यांसमोर नवे संकट निर्माण झाले आहे. जुन महीन्यात मृगाच्या सरी बरसताच शेतकर्‍यांनी उसनवारी व कर्ज काढुन खरीपाची पेरणी केली या आठवड्यात लातूर जिल्ह्याच्या सर्व भागात चांगला पाऊस झाल्याने पिकाला जीवदान मिळाले आहे.

सोयाबीन पिकावर खोड माशीचा प्रादुर्भाव; उत्पादन घटण्याची शक्यता
माढ्याच्या सब जेल मधुन चार सराईत आरोपींनी ठोकली धूम !

पिके चांगली बहरली आहेत त्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा उंचावल्या शेतकरी मोठ्या उत्साहाने जोमात अंतर मशागतीची कामे केली. परंतु सध्या सोयाबीन पिकावर रोग राईचा प्रादुर्भाव झालेला दिसु लागला आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाला फवारणी करणे गरजेचे आहे. ही खोडमाशीचा, पाने खाणाऱ्या अंळीचा आणि गोगलगायीचा सोयाबीन पिकावर हल्ला करीत असल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

खोडमाशी, पाने खाणारी अळी, चक्रीभुगा याचा प्रादुर्भाव झालेले सोयाबीन पिकाचे रोगराई पासुन होणारे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाचा वतीने शिवार फेरी करुन शेतकर्‍यांना यावर काय उपाय करणे गरजेचे आहे. अश्या विविध संकटाला शेतकर्‍यांला सामोरे जावे लागत आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com