ट्रॅक्टर आमचं डिझेल तुमचं; शेतकरी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनीचा उपक्रम

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. अशा शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून शेतकरी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनीने ट्रॅक्टर आमचं डिझेल तुमचं नफा ना तोटा या तत्त्वानुसार मोफत पेरणी करून देण्यात येत आहे.
ट्रॅक्टर आमचं डिझेल तुमचं; शेतकरी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनीचा उपक्रम
ट्रॅक्टर आमचं डिझेल तुमचं; शेतकरी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनीचा उपक्रमसंतोष जोशी

संतोष जोशी

नांदेड : यंदा खरीपासाठी पाऊस Rain चांगला झाल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी Farmers पेरण्या केल्या मात्र. तीन आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे Double sowing संकट ओढवले. अशा शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून शेतकरी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनीने ट्रॅक्टर आमचं डिझेल तुमचं नफा ना तोटा या तत्त्वानुसार मोफत पेरणी करून देण्यात येत आहे. Initiative of Shetkari Mitra Farmer Producer Company

हे देखील पहा-

नेहमी कोणत्या ना कोणत्या संकटांचा सामना कराव्या लागणाऱ्या बळीराजाला यावर्षी वेळेवर पेरणी झाल्याचे समाधान वाटण्या अगोदरच पावसाने दिर्घकाळ उघडीप दिली. पेरलेले बियाणे Seeds उगवले की नाही याची शाश्वती नाही. अनेक भागात Area दुबार पेरणी Double sowing करण्याचे संकट दिसत आहे.

ट्रॅक्टर आमचं डिझेल तुमचं; शेतकरी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनीचा उपक्रम
फॉरेक्स ट्रेडिंग करण्यास सांगून लाखो गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक; रॅकेटचा पर्दाफाश

पहिलीच पेरणी मोठ्या मुश्किलीनं केली त्यात दुबार पेरणीचे संकट आल्यास शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जाण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून अशा अडचणीच्या काळात कर्तव्यभावनेने शेतकर्यांना मदत करण्यासाठी शेतकरी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनी मालेगावच्या वतीने पंचकृषीतील शेतकऱ्यांसाठी नफा ना तोटा तत्त्वावर डिझेल तुमचं ट्रॅक्टर आमचं या तत्त्वावर मोफत पेरणी करून देण्यात येत असल्याचे शेतकरी मित्र फार्मर प्रोडय़ुसर कंपनीचे कृषिभूषण भगवान इंगोले यांनी सांगितले.

या अनोख्या उपक्रमाचं शेतकर्यांना मदतीचा हात देण्याची भूमिका घेतली त्यांच्या या भूमिकेचं सर्व स्तरातून स्वागत केलं जातं आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com