तयारी खरिपाची; २७ लाख कपाशी बियाणांची पाकिटे उपलब्ध

तयारी खरिपाची; २७ लाख कपाशी बियाणांची पाकिटे उपलब्ध
तयारी खरिपाची; २७ लाख कपाशी बियाणांची पाकिटे उपलब्ध
Cotton SeedsSaam tv

जळगाव : यंदा कपाशीची लागवड अधिक होणार असल्याने २७ लाखापेक्षा अधिक पाकिटे बियाणे जिल्ह्यात येतील. जिल्ह्यात १ लाख ३३ हजार ४८२ मेट्रीक टन खतांचा साठा उपलब्ध आहेत. शिवाय ११ हजार ६८२ मेट्रीक टन खतांचा बफर स्टॉक करण्यात येणार आहे. यावर्षी जिल्ह्यात बी-बियाणे, खतांची कोणतीही (Jalgaon News) कमतरता भासणार नाही, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली. (jalgaon news 27 lakh cotton seed packets available)

Cotton Seeds
लग्‍नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार

पूर्वी मे महिन्यातच अनेक बागायतदार (ज्यांच्याकडे शेतात पाणी आहे ते) कपाशीची पेरणी करीत. मात्र गेल्या काही वर्षापासून गुलाबी बोंड अळीच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांना (farmer) बियाणे मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात मिळते. यामुळे बागायतदारांची पंचाईत झाली आहे. तरीही बियाणे (Cotton) येईल तेव्हा पेरू. आतातर शेत पेरणी योग्य करण्याच्या उद्देशाने शेतातील काडीकचरा वेचणे, धस, पळकाट्या जाळणे, बांधावरील तण काढणे, अशी कामे सुरू करीत आहेत. शेत स्वच्छ करून पेरणी योग्य करण्याच्या कामास वेग आला आहे.

४६० एकरात तुतीची लागवड

जिल्ह्यात २०२२ - २३ या वर्षात मनरेगाअंतर्गत ३३० एकर तर इतर योजनेअंतर्गत १३० अशा एकूण ४६० एकरात तुतीची म्हणजे रेशीमची लागवड होणार आहे. यासाठी २ कोटी ३७ लाख खर्च येणार आहे. यातून १६ हजार ८८० क्विंटल कोष उत्पादनाचा अंदाज असून उत्पादन सुमारे ८० कोटी ८८ लाख रुपयांचे अपेक्षित आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.