कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
Farmer Suicide
Farmer SuicideSaam tv

चाळीसगाव (जळगाव) : बॅंकेकडून घेतलेल्‍या कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना (farmer Suicide) टाकळी प्र.दे. येथे आज सकाळी उघडकीला आली. (jalgaon news chalisgaon Debt ridden farmer commits suicide)

Farmer Suicide
‘ती’च्या निर्धारापुढे नियतीही झुकली; अखेर दोघे विवाहबद्ध

टाकळी प्र.दे (ता. चाळीसगाव) येथील योगेश दिलीप पवार (वय ४०) यांनी बॅंकेच्या कर्जाला कंटाळून आंबा फाटाजवळील मन्याड डॅम येथे विष घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना सकाळी सुमारास घडली आहे. गावातील भाऊसाहेब हिम्मत पवार, कैलास बाबुराव देवरे, दिलीप उत्तम पवार यांना योगेश बेशुद्ध अवस्थेत मिळून आला. योगेशला गावकऱ्यांनी खासगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात (Hospital) दाखल केले. त्याअगोदर योगेशचा मृत्यू झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. योगेशच्या पाश्चात्य पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

घरातील कर्ता पुरुषच गेला

पवार कुटुंबाच्या घरात अगोदरच अठरा विश्व दारिद्री आहे. घरातील कर्ता पुरुषच काळाच्या पडद्याआड गेल्याने गावासह परिसर सुन्न झाला आहे. तत्पूर्वी या घटनेबाबत माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याबाबत मेहूणबारे पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com