Parola: विहिरीत टाकले रासायनिक द्रव्य; ग्रामस्थांमध्ये भीती

विहिरीत टाकले रासायनिक द्रव्य; ग्रामस्थांमध्ये भीती
Parola News Farmer
Parola News FarmerSaam tv

पारोळा (जळगाव) : दळवेल (ता. पारोळा) शिवारातील एका विहिरीत दर दहा ते पंधरा दिवसांत अज्ञात टॅंकर चालकाकडून रासायनिक द्रव्य टाकले जात आहे. ज्यामुळे विहिरीतील पाणी दुर्गंधीयुक्त होत असून या पाण्यापासून (Jalgaon News) धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याबाबत संबंधित टॅंकरचालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (Jalgaon News Parola Farmer Well in Chemical)

Parola News Farmer
Dhule: महाराष्ट्र ठेलारी महासंघाची इच्छामरणाची मागणी; प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष

राष्ट्रीय महामार्गालगत दळवेल गाव असून येथील शेतकऱ्यांची (Farmer) रस्त्यालगत शेती आहे. काही शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून कुक्कुट पालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. दळवेल येथील रामलाल भटू पाटील यांच्या रस्त्यालगतच्या शेतात विहिर आहे. या विहिरीचे पाणी बहुतांश कुक्कुटपालन व्यवसाय करणारे वापरतात. परंतु, या विहिरीत अज्ञात टँकर चालकाकडून दर दहा ते पंधरा दिवसात रासायनिक द्रव्य टाकले जात आहे. या विहिरीचे पाणी कोंबड्यांसाठी वापरले जात असल्याने त्यापासून धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

विकतचे पाणी आणून टाकले विहिरीत

शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाच्या लहरीपणामुळे येथील काही शेतकऱ्यांनी पिके जिवंत ठेवण्यासाठी तसेच गुरांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून विकतचे पाणी आणून या विहिरीत टाकले आहे. काही टँकरचालक मात्र या विहिरीत रासायनिक द्रव्य टाकत असल्याने त्यापासून निर्माण होणारा धोका लक्षात घेता, अज्ञात टँकरचालक विरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दिवसभर शेतात तसेच परिसरात कोणी ना कोणी असल्याने विहिरीत रासायनिक द्रव्य टाकण्याचा प्रकार रात्री घडत असतो. दरम्यान, रासायनिक द्रव्ययुक्त पाणी पिकांना दिले तर हानीकारक ठरु शकते. शिवाय या पाण्यापासून कोंबड्यांना देखील धोका उद्भवू शकतो. त्यामुळे अज्ञात टॅंकरचालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कारदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी चतुर पाटील, रामलाल पाटील, दीपक गिरासे, संभाजी पाटील, सुनील पाटील, भगवान पाटील, शिवाजी गवळी, राजेंद्र पाटील, लोटन पाटील, पुरुषोत्तम पाटील, रोहिदास पाटील आदींनी केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com