Jalgaon: शेतात विज पडल्याने विद्युत रोहित्रासह कपाशी पिकाचे नुकसान

शेतात विज पडल्याने विद्युत रोहित्रासह कपाशी पिकाचे नुकसान
Jalgaon News Farmer
Jalgaon News FarmerSaam Tv

तोंडापूर (जळगाव) : तोंडापूर परिसरात सतत पडत असलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. यात कुंभारी बु. येथील शेतातील विद्युत रोहित्रावर वीज (Lightning Strike) पडल्याने रोहित्र व कपाशीचे (Cotton) उभे पिक जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Jalgaon News lightning strike)

Jalgaon News Farmer
पितृपक्षात भाजीपाला तापला.. गवाराचे भाव किलोला ८० तर वांगी १२० रुपये किलो

अजिंठा डोंगररांगामध्ये सतत पडत असलेल्या पावसामुळे व कुंभारी बु. डोंगराच्या परिसरात असल्याने सतत पडत असलेल्या पावसात (Rain) कुंभारी शिवारातिल गावालगतच दुर्योधन हरी जोशी यांच्या शेतातील विद्युत रोहित्रावर विज पडली. वीज पडल्याने रोहित्र जळाले. यात रोहित्राच्या आजुबाजूला असलेली तिन एकर कपाशीच्या पिकांपैकी एक एकरच्या आसपास कपाशीच्या पिकाला आस लागून सुकून गेली आहे.

लाखोचे नुकसान

सकाळी शेतकरी (Farmer) शेतात गेले असता त्याच्या हे लक्षात आले. त्यांनी सदर घटनेची माहिती त्याचा मुलगा श्रीराम जोशी यांनी तलाठी व विज अभियंता तोंडापूर यांना कळविण्यात आली आहे. एक एकरच्या आसपास कापसाची पिक जळून नुकसान झाले व शेतातील विद्युत रोहित्र अंदाजे लाखाचे तर कपाशी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने पंचनामा करण्यात येवून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांन कडून करण्यात येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com