ई-पीक ॲपसाठी शेतकऱ्यांना अडचणीच
ई-पीक

ई-पीक ॲपसाठी शेतकऱ्यांना अडचणीच

ई-पीक ॲपसाठी शेतकऱ्यांना अडचणीच

चोपडा (जळगाव) : राज्य सरकारने या वर्षी ई-पीक पाहणी अ‌ॅप सुरू केले आहे. महसूल आणि कृषी विभागातर्फे ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत असून, शेतकरी संभ्रमात आहेत. (jalgaon-news-Difficulties-for-farmers-for-e-crop-mobile-app)

माझी शेती, माझा सातबारा, माझा पीकपेरानुसार शेतकरी ई-पीक पाहणी ॲपवर नोंदणी करीत असले, तरी यात पिकाचा फोटो अपलोड होत नाही. जास्तीत जास्त तीनच फोटो अपलोड होत असल्याने त्यापेक्षा जास्त पिके असतील, तर फोटो अपलोड कसे करावे? सामाईक क्षेत्र असेल, तर कोणत्या खातेदाराच्या नाव टाकावे? वेगवेगळी पिके असतील, तर नोंदणी कशी करावी? लोकेशन मागत असल्याने शेतात नेटवर्कची समस्या निर्माण होते. गटाचा पेरा भरताना तलाठ्याशी संपर्क करावा, असा मेसेज येतो. कॅमेरा लवकर ओपन होत नाही. माहिती भरल्यानंतर पुन्हा पुन्हा माहिती भरून साठविली जात नाही.

नोंदणी करणे आवश्यक

सर्वसाधारण परिस्थिती असलेल्या शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवरून माहिती भरल्यास पुढील वेळेस सांकेतांकची अडचण येण्याची शक्यता आहे. खरीप व रब्बी हंगामात नोंदणी करणे आवश्यक आहे. यामुळे दोन वेळा नोंदणी करावी लागणार आहे.

ई-पीक
धक्‍कादायक..फेसबुकवरुन कुटूंबाचे फोटो काढून ब्लॅकमेलींग

जनजागृतीची गरज

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पीक पाहणी ॲपला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे, तर काही ठिकाणी महसूल प्रशासनाला पीक पाहणी ‌ॲपचा वापर करावा, यासाठी शेतकऱ्यांमध्ये अजूनही जनजागृती करावी लागत आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com