दोन महिन्यात साडे दहा लाखाची कमाई; काश्मीरी चाखणार दहिवदच्या टरबूजची चव!

दोन महिन्यात साडे दहा लाखाची कमाई; काश्मीरी चाखणार दहिवदच्या टरबूजची चव!
watermelon
watermelonwatermelon

गणपूर (जळगाव) : दहिवद (ता. शिरपूर) येथील रमेश भादू सूर्यवंशी यांनी कराराने शेती केली. तीन एकरात टरबुजाची लागवड करून दोन महिन्यात साडेदहा लाख रुपयांचे उत्पन्न घेतले. इतकेच नाही तर या टरबुज दिल्‍ली व काश्मीर येथे रवाना झाले आहे. (jalgaon-news-Earnings-of-ten-and-a-half-lakhs-in-two-months-farmer-watermelon-farming)

दहीवद येथील शेतकरी रमेश सूर्यवंशी कराराने शेती करत त्‍यावर उत्‍पन्‍न काढण्यास सुरवात केली. त्‍यांनी दहा एकर क्षेत्रात टरबुजची 10 मे पासून लागवड केली. यात तीन एकरवर स्वतंत्र, तीन एकर केळीत तर तीन एकर टरबुजची लागवड मिरचीच्या पिकात आंतरपीक म्हणून केली आहे. त्याच्यापैकी तीन एकर क्षेत्रातील मालाची काढणी नुकतीच आटोपली आहे.

तीन एकर क्षेत्रातील काढणीत त्यांना ४५ टन माल २१ रुपये किलोप्रमाणे तर १० टन माल १२ रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री झाला. त्यातून त्यांना १० लाख ६५ हजार रुपयांचे उत्पन्न आले आहे. व्हीनोरा गोल्ड कंपनीचे बियाणे वापरून त्यांनी अवघ्या साठ दिवसात हा उन्हाळी प्लांट यशस्वी केला. त्यांच्या प्लांटला अन्य तालुक्यातील शेतकऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

watermelon
शाळेला चाललो आम्‍ही..धुळ्यातील ग्रामीण भागात शाळा सुरू

नदी एवजी आता शेतात लागवड

टरबुजची शेती भलेही पूर्वी नद्यांमध्ये होत असली, तरी नद्या उन्हाळ्यात लुप्त होऊ लागल्यापासून शेत शिवारात लागवड केली जात आहे. सूर्यवंशी यांनी आदर्श पद्धतीने पिकवलेल्या टरबुजमुळे त्यांची पीक घेण्याची पद्धत अधोरेखित झाली आहे.

काश्‍मीरला रवाना

रमेश सुर्यवंशी यांनी टरबूजचे चांगल्‍या पद्धतीने उत्‍पादन मिळविल्‍यानंतर त्‍याची निर्यात दिल्‍ली व काश्‍मीरला केली आहे. यामुळे त्‍यांना चांगला भाव देखील मिळाला असून, ट्रान्‍सपोर्टचा खर्च काढून देखील त्‍यांनी टरबूजची शेती फायद्यात राहिली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com