Jalgaon: वीज पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू; यावल तालुक्‍यातील घटना

वीज पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू; यावल तालुक्‍यातील घटना
Jalgaon News Farmer
Jalgaon News FarmerSaam tv

जळगाव : यावल तालुक्‍यातील आमोदा येथील रहिवासी शेतकरी शेतात काम करीत असताना आज (३ जुलै) दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास अंगावर वीज पडून जागीच ठार झाला. शेतकऱ्याच्‍या (Farmer) मृत्‍यूने आमोदा गावात शोककळा पसरली आहे. (Jalgaon News Farmer Death)

Jalgaon News Farmer
Crop Insurance: बीड जिल्ह्यातील १६ लाख शेतकऱ्यांनी भरला पिक विमा

आमोदा येथील रहिवासी ज्ञानदेव धनु चौधरी (वय ६०) हे आमोदा शिवारातील आपल्या शेतात पिकांची मशागत करत होते. दरम्‍यान अचानक ढगांचा व विजांचा कडकडाट होऊ लागला. यात एक ते दोन वाजेच्या सुमारास अंगावर वीज पडून (Lightning Strike) त्‍यांचा जागीच ठार झाला. या शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने मुले उघड्यावर पडले आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळावी; अशी मागणी होत आहे.

मदतीची मागणी

फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Police) पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सानप यांनी पंचनामा केला. शेतकऱ्याला व कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी परिसरातून होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com