Cotton: कापसाला यंदा चांगला भाव; आंतरराष्ट्रीय कापूस परिषदेत तज्ञांचा सूर

कापसाला यंदा चांगला भाव; आंतरराष्ट्रीय कापूस परिषदेत तज्ञांचा सूर
Cotton Price
Cotton PriceSaam tv

जळगाव : चीन, पाकिस्तान, बांगलादेश येथे कापसाचे ४० ते ४५ टक्के नुकसान झाले आहे. त्याचा फायदा भारताला होणार असून कापसाची (Cotton) सर्वत्र निर्यात वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच सोन समजल्या जाणाऱ्या कापसाला यंदा चांगला भाव (Cotton Price) मिळेल. १५ टक्के कापसाचे उत्पादनही वाढेल. जिनिंगलाही चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा या आंतराष्ट्रीय परिषदेत सहभागी तज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून तोटा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच कापसावरील आधारीत टेक्टटाईल्स क्षेत्रातील व्यावसायिक, उद्योजकांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Jalgaon News Cotton Price)

Cotton Price
कोर्ट आवारात अस्‍वलाचा धुमाकूळ; लोकांनी केली तोबा गर्दी

खानदेश जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी ओनर्स असोसिएशनच्यावतीने जळगावात (Jalgaon) जैन हिल्स आंतरराष्ट्रीय कापूस परिषद पार पडली. या परिषदेच्या शासनाचे प्रतिनिधी तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसह (Farmer) देश विदेशातील सहाशे पेक्षा जास्त कापूस आयातदार तसेच निर्यातदार सहभागी झाल्याचं पहायला मिळाले. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळावा. बदलत्या स्पर्धेत प्रत्येक शेतकऱ्याने टीकून रहावे, या उद्देशातून कापूस परिषदेत कापूस उत्पादक शेतकरी, तसेच कापसापासून विविध उत्पादन घेणारे उद्योजक व्यावसायिक यांना फायदा होईल. या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय या परिषदेत घेण्यात असून त्यावर विचारमंथन केले जात आहे.

चांगल्‍या प्रतीचे बियाणे वापरावे

प्री मान्सूनच्या आधारावर अल्पावधीची येणारी पिके लावावाती. मात्र येथील शेतकऱ्यांना ते माहितच नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसानाला शेतकऱ्याला सामोरे जावे लागले. ही बाब शेतात पाहणी केल्यानंतर समोर आलेली आहे. शास्त्रज्ञ प्रत्येकापर्यंत पोहचू शकत नाही, म्हणून प्रत्येकाने आपल्याकडील ज्ञान हे इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले पाहिजे. तसेच ठीबक सिंचन वापर केला पाहिजे. तसेच चांगल्या प्रतीचे बियाणे लागवडीसाठी वापर केला पाहिजे. त्यामुळे पाण्याची बचत होते व उत्पादनही चांगली येईल, हाच शेतकऱ्यांची पिके पाहणीमागणचा उद्देश असल्याचे कॉटन टेक्सटाईल मिनिस्टी ऑफ इंडियाच्या डेप्युटी डायरेक्टर उषा पोड यांनी सांगितले.

बीटीवर रोग, वेगळ्या वाणाची निर्मिती करावी

जागतिक पातळीवर कापूस उत्पादनात अग्रेसर असलेल्‍या चीन, पाकिस्तान आणि अमेरिकेत कापूस पिकाचे मोठे नुकसान झाल्याने भारतीय कापसाला मोठी मागणी निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी चीन, पाकिस्तान तसेच बांगलादेशातून कापसासाठी मागणी होती. त्याठिकाणी भारतातून कापसाची निर्यात वाढेल. गेल्या काही वर्षांपासून कापसाचे जे बीटी वाण आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे रोग आले असून त्याचा सामना शेतकऱ्यांना नुकसानाच्‍या स्वरुपात करावा लागत आहे. शासनाने नवीन वाणाची निर्मीती करावी, जेणेकरुन त्यावर रोग येणार नाही अशी विनंती परिषदेच्या माध्यमातून शासनाला करण्यात आली असून त्यामुळे शेतकऱ्याचे एकरी उत्पन्न वाढेल असा आशावाद खान्देश जिनिंग असोसिएशन अध्यक्ष प्रदीप जैन यांनी व्यक्त केला.

देशात केळीपाठोपाठ जळगाव जिल्हा हा कापूस उत्पादनातही तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर कापूस निर्यात करण्यात अग्रेसर जिल्हा आहे. शेतकरी ते शेवटचा घटना उत्पादक यापर्यंत ती पोहचण्यास मदत होते. त्यामुळे उत्पादनासाठी, शेतीतील तोटे नुकसान कमी होतील. शास्वत विकास साधता येईल, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास या क्षेत्रातील धोके टाळता येतील. त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पादन वाढावा, त्याला फायदा व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या कापूस परिषदेत महत्वाचे निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती खान्देश जिनिंग असोसिएशनचे सचिव अतुल जैन यांनी दिली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com