दरवर्षी खरीप संकटात; पिके पेरावे तरी कोणते?

दरवर्षी खरीप संकटात; पिके पेरावे तरी कोणते?
दरवर्षी खरीप संकटात; पिके पेरावे तरी कोणते?
खरीप

जळगाव : कपाशीवर बोंड आळी तर उडीद मूग व मका दरवर्षी अतिवृष्टीची नुकसान होत असल्यामुळे पिके पेरावी तरी कोणते? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. खराब झालेला माल कमी दराने विकावा लागत असल्यामुळे त्याचप्रमाणे विमा कंपन्या विमा देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे दरवर्षी शेतकरी सुलतानी व अस्मानी संकटात सापडत असून शेती तोट्यात चालली आहे त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

मागील तीन-चार वर्षापासून खरीपाची पिके कमी परतीच्या अवकाळी पावसामुळे तर कधीही मान्सूनच्या अतिवृष्टीच्या कचाट्यात सापडला आहे कधीकाळी विदर्भात पांढरे सोने म्हणून असलेले कापसाचे बोंड अळीच्या प्रादुर्भावाने हद्दपार झाले आहे. यावर्षी सुद्धा मोठ्या क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. उडीद व मग पाठोपाठ मका खराब होत असून गतवर्षी सारखी स्थिती निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्यात पीकवाढीच्या काळात तीन आठवड्याची आता पीक काढणीस आल्यानंतर अतिवृष्टी मुळे हातातोंडाशी आलेले पिक खराब होत आहे. यावर्षी ही मागील वर्षीप्रमाणे उडीद मूग व मका संकटात सापडले आहे. मागील वर्षी कापसाचे आतोनात नुकसान झाले असले तरी विमा कंपनीने नुकसान भरपाई दिलीच नाही.त्यामुळे शेतकऱ्यांचा विमा कंपन्यांवरील विश्वास उडाला परिणामी या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी विमा कंपनी कडे पाठ फिरवली खराब झालेल्या शेतमालाला कमी भाव विमा कंपनीची टाळाटाळ शेतकरी दरवर्षी अस्मानी व सुलतानी संकटात सापडत आहे. त्यामुळे ती पेरावी तरी कोणती असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहेत.

खरीप
कर्जत-जामखेड पुन्हा चर्चेत! पवार-शिंदेंचा पुन्हा सामना

संपूर्ण खरिपच आले धोक्यात

जिल्ह्यात ९५ टक्के जमिनीवर कापसाचा पेरा आहे. पाच टक्के असलेले उडीद मुगाचे पीक सततच्या पावसाने सडून गेले आहे.आता कापसावर आशा असताना पाऊस दररोज पडत असल्याने कापसाच्या झाडावरच कोंब फुटत आहे.शेतकऱ्याने करावे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Related Stories

No stories found.