सवलतीचा किसान रॅक बंद होण्याच्या मार्गावर

सवलतीचा किसान रॅक बंद होण्याच्या मार्गावर
सवलतीचा किसान रॅक बंद होण्याच्या मार्गावर
Kisan RailwaySaam tv

रावेर (जळगाव) : कोळशाच्या रॅकला प्राधान्य देण्याचे निमित्त पुढे करून केळी उत्पादक शेतकऱ्यांना व्हीपीयू प्रकारच्या वॅगन्स निम्म्या भाड्यात उपलब्ध करून देण्याचे नाकारणाऱ्या रेल्वेने शेतकऱ्यांनी (farmer) पूर्ण भाडे भरण्याचे मान्य करताच या वॅगन्स उपलब्ध करून दिल्या आहेत. किसान रॅकच्या सवलती टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे केंद्र सरकारचे आणि रेल्वेचे (railway) धोरण यातून स्पष्ट झाले असून, यापुढे केळी उत्पादक शेतकऱ्यांना पूर्ण भाडे भरूनच केळी वाहतुकीसाठी वॅगन्स उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे केळी (Banana) उत्पादक शेतकऱ्यांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (jalgaon news kisan railway Concessional farmer rack closing)

Kisan Railway
दुचाकी दगडावर आदळल्‍याने तरुणाचा जागीच मृत्‍यू

रावेर (raver) आणि सावदा रेल्वेस्थानकातून केळी दिल्लीला पाठविण्यासाठीची किसान रॅकची निम्म्या भाड्याची सवलत पुन्हा सुरू होण्याची चिन्हे आता धूसर झाली आहेत. अखेर नाईलाजाने सावदा रेल्वेस्थानकातील केळी भरून पाठविणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांनी भाड्यात अनुदान न घेता म्हणजे पूर्ण भाडे भरून व्हीपीयू प्रकारच्या रॅकमधून दिल्ली येथे केळी पाठवली. तर ७ मेपर्यंत रेल्वे बोर्डाचे किसान रॅकच्या वॅगन्स पुन्हा अनुदानावर उपलब्ध करून देण्याबाबतचे पत्र न मिळाल्यास रावेर रेल्वेस्थानकावरील युनियन देखील पूर्ण भाडे भरून व्हीपीयू प्रकारच्याच वॅगन्स भरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बीसीएन वॅगन्समधून वाहतूक

देशातील कोळसा वाहतुकीला प्राधान्य देण्याचे केंद्राचे धोरण पाहता रेल्वे बोर्डाने शेतीमाल वाहून नेण्यासाठीची किसान रॅकच्या भाड्यात निम्म्याने सवलत देण्याची योजना तात्पुरती बंद केली आहे. त्याऐवजी शेतकऱ्यांना जुन्या आणि पारंपरिक पद्धतीच्या बीसीएन वॅगन्स पुरविण्यात येत आहेत. मात्र या लोखंडी पत्र्याच्या पारंपरिक वॅगन्समधून दिल्लीला जाणारी केळी काळी पडत असून, व्यापारी आणि शेतकऱ्यांनी ही केळी खरेदी करणे टाळले आहे. म्हणून गेल्या पाच दिवसांपासून रावेर रेल्वेस्थानकातून या प्रकारच्या वॅगन्समधून केळी भरून पाठविणे बंद होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.