पारोळ्यात महामार्गालगत भरला गुरांचा बाजार; शेतकरी हतबल, भीतीपोटी पशुधन विक्रीला

पारोळ्यात महामार्गालगत भरला गुरांचा बाजार; शेतकरी हतबल, भीतीपोटी पशुधन विक्रीला,
Parola Cattle Market
Parola Cattle MarketSaam tv

पारोळा (जळगाव): जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी लंम्पी आजारामुळे पशुधन संकटात आले आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे हातात तोंडाशी आलेला घास त्यात पशुधनांवर (Lumpy Disease) लंम्पी आजारांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी (Farmer) पूर्णपणे हातबल झाला आहे. भीतीपोटी आपले पशुधन विक्रीस शेतकरी आणत आहे. (Jalgaon News Parola Lumpy Virus)

Parola Cattle Market
Jalgaon Crime: लहान भावाचा खून करून मृतदेह फेकला नदीत

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पुढील आदेश होईपर्यंत गुरांचे बाजार भरू नये; असे असताना देखील पारोळा (Parola) येथे रविवार आठवडे बाजार असल्याने शेकडोच्या संख्येने गुरांना विक्रीसाठी आणून शेतकऱ्यांनी गुरांचा बाजार भरविला. बाजार समितीने गुरांचा बाजार भरविण्यास मज्जाव केल्याने हा बाजार पारोळा शहराच्या बाहेरून जाणारा नवीन बायपास अमळनेर रोड लगत भरला होता.

पहाटेच भरला बाजार

बाजारात शेकडो लहान वाहनांनी जनावरे घेऊन शेकडो शेतकरी आले होते. यात सातशे ते आठशे जनावरे विक्रीला आणलेले होते. यात जास्त करून बैलांचा समावेश जास्त होता. बाजार कोणाच्या आदेशाने भरविण्यात आला त्याचा तपास केला असता शेतकऱ्यांनीच व विकत घेणाऱ्या बैल व्यापाऱ्यांनी परस्पर हा बाजार भरविला असल्याचे समजले. सकाळी सहा वाजेपासूनच हा बाजार भरविण्यात आला होता.

संकटामुळे गुरे विक्रीला

अतिवृष्टी हाताचे गेलेले कडधान्य, शेतात असलेल्या पिकांसाठी हाता तोंडातशी आलेला घास वाचविण्यासाठी, पिकांना लागणारी मजुरी फवारणीसाठी पैसा या अडचणी दूर करण्यासाठी आणि जनावरांना आलेले नैसर्गिक लम्पी रोगाचे सावट यामुळे शेतकरी हवालदिलं झालेला आहे. त्यामुळे ना इलाजास्तव आपल्या पोटच्या पोराप्रमाणे वाढविलेले गुरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

सदर गुरांचा बाजार जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये मार्केट यार्डमध्ये बंद आहे. मात्र हायवे लगत भरलेला गुरांचा बाजाराशी मार्केट कमिटीचा कोणताही संबंध नाही. सदर बाजार परस्पर भरविण्यात आला आहे.

रमेश चौधरी, सचिव मार्केट कमेटी, पारोळा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com