खानदेशातील १५ हजार शेतकरी झाले वीजबिल थकबाकीमुक्‍त

खानदेशातील १५ हजार शेतकरी झाले वीजबिल थकबाकीमुक्‍त
खानदेशातील १५ हजार शेतकरी झाले वीजबिल थकबाकीमुक्‍त
खानदेशातील १५ हजार शेतकरी झाले वीजबिल थकबाकीमुक्‍तSaam Tv

जळगाव : कृषिपंप वीज धोरण २०२० ला शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढत आहे. या धोरणानुसार वीजबिलांच्या एकूण थकबाकीमध्ये तब्बल ६६ टक्क्यांपर्यंत माफी देणाऱ्या योजनेतून खानदेशातील १५ हजार ६५ शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत. तर ७८ हजार ८१० शेतकऱ्यांची थकबाकीमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. (jalgaon-news-mahavitaran-scheme-farmer-maha-krushi-abhiyan-peanding-bill-submit)

महावितरणने गेल्या मार्चपासून कृषिपंप वीज धोरण २०२० च्या अंमलबजावणीस सुरुवात केली. यामध्ये राज्यातील ४४ लाख ४३ हजार २४७ तर खानदेशातील ३ लाख ६४ हजार ९३ शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीजबिलांतून थकबाकीमुक्त होण्याची संधी उपलब्ध आहे.

१९०० कोटी रूपयांची सुट

जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांकडे ५ हजार ४२२ कोटी ४५ लाख रुपयांची एकूण थकबाकी होती. मात्र निर्लेखनाद्वारे महावितरणकडून मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट अशी १ हजार ८९९ कोटी २३ लाख रुपयांची सूट देण्यात आली. या धोरणानुसार खानदेशातील थकबाकी ३ हजार ५२३ कोटी २२ लाख रुपये आहे. या सुधारित थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम येत्या ३१ मार्च २०२२ पर्यंत भरल्यास थकबाकीची उर्वरित ५० टक्के रक्कमही माफ होणार आहे.

खानदेशातील १५ हजार शेतकरी झाले वीजबिल थकबाकीमुक्‍त
जळगाव जिल्ह्यात वाजली शाळांची घंटा; ३०६ गावातील शाळांमध्‍ये भरले वर्ग

३८ कोटी थकबाकी माफ

खानदेशातील १५ हजार ६५ शेतकऱ्यांनी ५० टक्के थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा केल्याने ते वीजबिलातून थकबाकीमुक्त झाले आहेत. धोरणानुसार खानदेशातील शेतकऱ्यांकडे ७६ कोटी ८० लाख रुपयांची थकबाकी होती. यातील चालू वीजबिल व ५० टक्के थकबाकी असा ४७ कोटी ५६ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे उर्वरित ३८ कोटी ४० लाख रुपयांची थकबाकीही माफ झाली आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com