Banana Crop: स्वयंचलित यंत्रात हवामान बदलाची नोंदच नाही; केळी उत्पादक पीक विम्यापासून वंचित

स्वयंचलित यंत्रात हवामान बदलाची नोंदच नाही; केळी उत्पादक पीक विम्यापासून वंचित
Banana Crop
Banana Cropsaam tv

जळगाव : जिल्ह्यातील यावल तालुक्यात बदलत्या हवामानामुळे केळी उत्पादनावर परिणाम झाला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. मात्र तालुक्यातील स्वयंचलित हवामान यंत्रात बदलत्या हवामानाची नोंद झाल्याने केळीचे नुकसान होवूनही केळी (Banana Crop) उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा पासून लाभ मिळू शकणार नाही. आधीच अस्मानी संकट त्यामुळे केळीवर आलेली रोगराई व स्वयंचलित हवामान यंत्रामुळे पीक विम्याची (Crop Inshurance) संरक्षण ही गेल्याने केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे. (jalgaon news no record of climate change in an automated device Banana crop insurance)

Banana Crop
St News: जेवणाच्या डब्‍यात दारूची बाटली; एसटीवर नेमलेला चालक मद्याच्‍या नशेत

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना हवामानाचा बदल केळीवर झाल्यास केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण मिळावे; यासाठी पिक विमा कंपनीच्या माध्यमातून स्वयंचलित हवामान यंत्र लावण्यात आले आहे. या यंत्राच्या माध्यमातून हवामानात झाल्याची नोंद करून हवामानामुळे केळीच्या पिकांचे नुकसान झाल्यास पीक विम्याचे संरक्षण केळी उत्पादक शेतकऱ्यांना (Farmer) दिले जाते. सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट पसरली असून याचा परिणाम केळीच्या पिकावर झाला आहे. थंडीमुळे केळीचे घड वाढत नसल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. मात्र यावल (Yawal) तालुक्यातील स्वयंचलित हवामान यंत्रात हवामानाचा बदल नोंदविला गेला नसल्याने मात्र केळीचे नुकसान होऊनही केळी उत्पादक शेतकऱ्यांना मात्र पिक विमा कंपन्यांकडून कुठलीही भरपाई मिळणार नाही.

यंत्र स्‍थलांतरीत केल्‍यास लाभ

स्वयंचलित हवामान यंत्र गाव शिवारात बसविण्यात आल्याने यात हवामानात झालेला नोंदविल्या जात नाही. सदर स्वयंचलित हवामान यंत्र हे शेत शिवारात स्थलांतरित केल्यास हवामानाचा योग्य बदल नोंदणी झाल्यास शेतकऱ्यांना योग्य तो लाभ होईल. त्यामुळे आमदार शिरीष चौधरी यांनी विमा कंपनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत सदोष स्वयंचलित यंत्र स्थलांतरित करण्याच्या सूचना केल्या आहेत.

लाभ मिळण्यास मात्र दिरंगाई

जिल्ह्यात एका तालुक्यात पीक विम्याचा लाभ मिळत असून यावल तालुक्यात मात्र पिक विम्याच्या लाभापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे. पिक कर्ज घेतेवेळी आवर्जून पीक विम्याची रक्कम ज्यातून कापली जाते. मात्र नुकसानीनंतर भरपाई देण्यासाठी दिरंगाई होते किंवा कारणे दाखविली जात असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com