केळीवर ईर्व्हीनिया रॉट रोगाची लागण

केळी पिकावर ईर्व्हीनिया रॉट या रोगाची लागण
केळीवर ईर्व्हीनिया रॉट रोगाची लागण
ईर्व्हीनिया रॉटईर्व्हीनिया रॉट

जळगाव : रसलपूर (ता.रावेर) येथील पांडुरंग हरी महाजन यांच्या शेतात एप्रिल महिन्यात लागवड केलेल्या केळी बागेवर ईर्व्हीनिया रॉट या रोगाची लागण झालेली चिकित्सा भेटीतून आढळून आले आहे. कृषी विज्ञान केंद्र पाल मार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर चिकित्सा भेट आयोजित करण्यात आली होती. (jalgaon-news-raver-aria-Erwinia-rot-on-banana-crop)

केळीवरील रोग इर्विनिया नावाच्या जिवाणूमुळे होतो. यामुळे याला इर्विनिया रॉट असेही म्हणतात. या रोगाचा प्रसार रोगग्रस्त कंद आणि मातीद्वारे होतो. या रोगाची लक्षणे लागवडीनंतर साधारणतः दोन ते तीन महिन्यांनी दिसू लागतात. यामध्ये रोगग्रस्त झाडावरील खालची पाने मलूल होऊन ती अचानकपणे झुकू लागतात. तसेच झाड जमिनीलगत सडण्यास सुरवात होते व त्या ठिकाणी गडद तांबडे किंवा पिवळे पाणथळ फुगवटे दिसून येतात. सडण्याची ही क्रिया कालांतराने वरील पाने व शेंड्याकडील वाढीच्या भागापर्यंत होते. जिवाणू संसर्गामुळे कंद हळूहळू कुजतात, मुळ्यांची संख्या कमी होते. मुळ्यांवरही वरीलप्रमाणे जखमा दिसून येतात व मुळ्यांची टोके वाळतात. अशी रोगग्रस्त झाडे जमिनीलगत कुजून हलक्‍या धक्‍क्‍याने अथवा वाऱ्याने कोलमडून पडतात. मात्र कंद व मुळ्या जमिनीतच राहतात.

रसलपूर येथे झालेल्‍या चिकित्सा भेटीप्रसंगी पालच्‍या कृषी विज्ञान केंद्राचे प्र. वरिष्ठ वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख प्रा. महेश महाजन यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या भेटीदरम्यान कृषी सहाय्यक संदीप बारेला, रविंद्र पाटील व शेतकरी उपस्थित होते.

ईर्व्हीनिया रॉट
भरपाई मिळण्यापासून वंचित; तापी पट्ट्यातील शेतकरी आक्रमक पवित्र्यात

असा करावा उपाय

रोगाच्या नियंत्रणासाठी काही उपाय करणे आवश्यक आहे यामध्ये नवीन लागवड केलेल्या केळी बागेच्या क्षेत्रात १०० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड, ३०० मिली क्लोरोपायरीफॉस २० टक्‍के ईसी, १५ ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लिन यांचे द्रावण तयार करून प्रत्येक झाडास २०० मिली द्रावण टाकावे. तसेच लागवडीच्या वेळी जमिनीतून ६ ग्रॅम ब्लिचिंग पावडरची भुकटी प्रति झाड द्यावे. त्यानंतर एक महिन्याच्या अंतराने चार वेळा हीच प्रक्रिया करावी. तसेच लागवडीनंतर १ महिन्याने ५०० पीपीएम स्ट्रेप्टोसायक्लिन द्रावणाची एक ते दोन लिटर प्रति झाड या प्रमाणात आळवणी करावी. दुसऱ्या व चौथ्या महिन्यात ट्रायकोडर्मा व्हिरीडी हे जैविक बुरशीनाशक ५० ग्रॅम प्रति झाड या प्रमाणात जमिनीतून द्यावे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com