केळीच्या दरात नवा उच्चांक

केळीच्या दरात नवा उच्चांक
Banana
BananaSaam tv

रावेर (जळगाव) : कापणी योग्य केळीचे झालेले कमी प्रमाण आणि अमरनाथ यात्रेमुळे केळीच्या मागणीत झालेली मोठी वाढीमुळे केळीने भावाचा नवा उच्चांक गाठला. येथील बाजार समितीने शुक्रवार (ता. १) साठी केळीचे भाव २ हजार रुपये क्विंटल असे जाहीर केले आहेत. बाजार समितीने जाहीर केलेल्या आतापर्यंतच्या भावाचा हा ऐतिहासिक उच्चांक असल्याचे शेतकऱ्यांकडून (Farmer) सांगितले जात आहे. मागील १५ दिवसांत केळीच्या (Banana) भावात सव्वा तीनशे रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. (jalgaon news raver bajar samiti New high in banana prices)

Banana
रेल्वे पॅन्ट्रीकारमध्ये अन्‍न शिजविणे आता कठीण; गॅस वापरण्यास बंदी

मागील वर्षी जून-जुलै महिन्यात केळीची लागवड कमी झाल्याचा (jalgaon News) परिणाम या वर्षी केळीच्या सर्वाधिक भावात दिसून येत आहे. कापणी योग्य केळी अतिशय कमी प्रमाणात आहे. मात्र, केळीची मागणी उत्तर भारतात कायम असल्याने केळीचे भाव दररोज टप्प्याटप्प्याने वाढत आहेत. १५ जूनला केळीचे भाव १६७० रुपये क्विंटल होते. तर टप्प्याटप्प्याने त्यात वाढ होत जाऊन केळीचे भाव शुक्रवारसाठी २ हजार रुपये क्विंटल जाहीर झाले आहेत. प्रत्यक्षात केळीचे व्यापारी शेतकऱ्यांकडून उत्कृष्ट दर्जाची केळी २२०० ते २३०० रुपये क्विंटल या दराने खरेदी करीत आहेत.

नेपाळमध्येही मागणी

मागील अनेक वर्षांत प्रथमच तालुक्यातील केळीची मागणी नेपाळमधील काठमांडू शहरात होत आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून काठमांडूकडे ही केळी रवाना केली जात आहे. तेथून दररोज सुमारे १०० टन केळीची मागणी होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com