Raver: वीज पडल्‍याने केळीच्‍या खोडांचे नुकसान

वीज पडल्‍याने केळीच्‍या खोडांचे नुकसान
Jalgaon Banana Crop
Jalgaon Banana CropSaam tv

रावेर (जळगाव) : ऐनपूर शिवारात शनिवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसादरम्यान केळीच्या (Banana) बागात वीज पडून सुमारे ३०० झाडे काळी पडून मोडली आहेत. यामुळे केळीचे मोठे नुकसान झाले आहे. (Jalgaon Raver News)

Jalgaon Banana Crop
वडिलांना भेटण्यास आलेल्या तृतीयपंथीयास मारहाण; वडिलांसह सावत्र आई, भावाविरुद्ध गुन्हा

शनिवारी (ता १०) सायंकाळी साडेपाचनंतर (Raver) तालुक्यात वादळी पावसाचा फटका बसला. त्यावेळी ऐनपूर शिवारातील संजय विश्वनाथ पाटील यांच्या शेतातील सुमारे २ महिन्यांपूर्वी लागवड केलेल्या (Banana Crop) केळीच्या खोडांवर विज पडल्याचे (Lightning Strike) आढळून आले. संजय पाटील यांचे बंधू आणि अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष भागवत पाटील आज सकाळी नेहमीप्रमाणे केळीच्या शेतात पाहणी करण्यासाठी गेले असताना ही बाब लक्षात आहे.

पाने काळी पडून झाड कोमेजलेत

केळीच्या बागेतील सुमारे ३०० झाडांवरील केळीची पाने काळी पडली असून कोमेजली आहेत. तसेच ही खोडे मधूनच मोडली आहेत. काल सायंकाळी ढगांच्या गडगडाटा बरोबरच विजेचा कडकडाटही मोठ्या प्रमाणात होत होता. त्यावेळी या परिसरात वीज पडून हे नुकसान झाल्याचा अंदाज त्यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com