जादा दराने बियाणे विक्री; तीन बियाणे विक्रेत्यांचे परवाने निलंबित

जादा दराने बियाणे विक्री; तीन बियाणे विक्रेत्यांचे परवाने निलंबित
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

जळगाव : जादा दराने बियाणे विक्री केल्याने तीन बियाणे विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. बियाण्यांचा साठा करणे, जादा दराने बियाणे विक्री करणे, बनावट बियाणे विकणे आदी बाबींवर (Jalgaon News) नियंत्रणासाठी जिल्हा अधीक्षक कृषी विभागातर्फे जिल्हा स्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकांची नेमणूक केली आहे. हे भरारी पथके केव्हाही तपासण्या करून कारवाई करीत असतात. (jalgaon news Selling seeds at an extra rate Licenses of three seed sellers suspended)

Jalgaon News
अवैध सावकाराच्या १२५ मालमत्ता; एलआयसीकडून साडेपाच कोटींचे कमिशन

भरारी पथकाने चोपडा व अमळनेर (Amalner) तालुक्यातील कृषी केंद्रांची तपासणी मोहीम हाती घेतली होती. त्यात मे. राजप्रभा फर्टीलायझर (चोपडा), मे. अग्रवाल ॲग्रो एजन्सी (चोपडा), मे. शाह एजन्सी (अमळनेर) हे तीन विक्रेते जादा दराने बियाणे विक्री करताना आढळून आले. त्याच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्यासमोर या प्रकरणांची सुनावणी झाली. त्यावर संबंधित बियाणे विक्रेत्यावर कारवाई करीत त्याचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी पेरणीची लगबग सुरू आहे. खरीप हंगामात खत, बियाणे विक्रीतून मोठ्या प्रमाणात शेतकरी (Farmer) बांधवांची फसवणूक होण्याचे प्रकार घडत आहे. यामुळे शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. हे प्रकार घडू नयेत यासाठी कृषी विभाग लक्ष ठेवून आहेत. शेतकरी बांधवांची फसवणूक केल्यास कृषी केंद्र चालकांचे परवाने रद्द करण्याचा इशारा कृषीविभागाने दिला होता. त्यानुसार वरील कारवाई करण्यात आली आहे.

तक्रारींचे आवाहन

जिल्ह्यात ज्या ठिकाणी बियाणे, खतांचे जादा दराने विक्री होत असेल, कोणी खतांची लिंकिंग करीत असेल तर संबंधितांनी ८४६८९०९६४१, ०२५७-२२३९०५४ यावर माहिती द्यावी. संबंधिताने नाव गुपित ठेवण्यात येईल, असे आवाहन कृषी अधिक्षक संभाजी ठाकूर यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com