Jalgaon News : एकाच दिवशी जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी संपविले जीवन; कर्जबाजारीपणाचे ठरले कारण

Jalgaon News : एकाच दिवशी जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी संपविले जीवन; कर्जबाजारीपणाचे ठरले कारण
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

जळगाव : यंदा पावसाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतीसाठी उपलब्ध केलेला पैसा, पीककर्ज डोक्यावर असल्याने कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत एकाच दिवसात दोन शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. (Jalgaon) जळगाव जिल्ह्यातील चोरवड येथील २७ वर्षीय तरुण (Farmer) शेतकऱ्याने विषप्राशन केले. तर कुऱ्हा- हरदो येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याने कर्ज व दुबार पेरणीला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. (Tajya Batmya)

Jalgaon News
Bogus Seeds: बियाणे कंपनीने केली शेतकऱ्याची फसवणूक; ८० दिवसातच निघाले धान

पारोळा : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील चोरवड येथील शेतकरी हेमराज शेखर पाटील (वय २७) यांच्याकडे पाच बिघे शेती आहे. त्यांनी कापसाची लागवड केली असून याकरिता (Parola) पीककर्जही घेतले होते. परंतु या वर्षी तालुक्यात कधी जास्त, तर कधी कमी व दीर्घकाळ खंड पडलेल्या पावसामुळे शेतात नापिकीसारखी परिस्थिती उद्‍भवली आहे. त्यामुळे पीककर्ज कसे फेडायचे, घरसंसार कसा चालवायचा, या नैराश्यातून त्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास शेतात विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबत त्यांनीच चुलत भावाला फोनवरून सांगितले. यानंतर नातेवाइकांनी धाव घेत त्यांना पारोळा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे आई, पत्नी व दोन वर्षांची मुलगी आहे. याबाबत नितीन पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Jalgaon News
Shahada News : शासकीय आश्रम शाळा भाड्याच्या खोलीत; पन्नास वर्षानंतरही हक्काची जागा नाही

बोदवड तालुक्यातही आत्महत्या 
बोदवड : तालुक्यातील कुऱ्हा-हरोदो येथील शेतकरी शंकर कृष्णा माळी (वय ४२) यांनी कर्जाला कंटाळून घराच्या छताला गळफास घेऊन (Bodwad) आत्महत्या केली. शेतकरी शंकर माळी यांनी शेतामध्ये पेरणी केली होती. परंतु मागील काळात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने माळी यांच्या शेतातील माती वाहून गेली. त्यात पेरणी केलेले बियाणेसुद्धा वाहून गेले होते. यातून सावरत पुन्हा दुबार पेरणी केली. निसर्गाच्या भिजपाण्यामुळे माळी यांची शेती जशी पडीकच पडली. या भिजपावसाने आणि मशागतीसाठी पावसामुळे वेळ मिळाला नसल्याने शेत पडीक अवस्थेत दिसू लागले. यामुळे शेतकरी शंकर माळी यांनी पेरणीसाठी विविध कार्यकारी सोसायटीकडून एक लाख कर्ज आणि काही खासगी बचत गटाच्या कर्ज काढले होते. त्याचा बोजा डोक्यावर होता. शेतकरी माळी हे मंगळवारी शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले आणि दुपारी तीनपर्यंत घरी आले आणि गळफास घेतला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com