Jalna : कर्ज कसं फेडणार? गळफास घेत शेतकऱ्याची संपवलं आयुष्य

या घटनेची भोकरदन पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.
Jalna Farmer
Jalna FarmerSaam Tv

Jalna Farmer News - जालना (Jalna) जिल्हा शेतकऱ्याच्या आत्महत्येने पुन्हा एकदा हादरला आहे. कर्जबाजीपणाला कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील कोळेगाव घडली आहे. कोंडीबा गव्हांडे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. लिंबाच्या झाडाला गळफास लावून घेतला आणि जीव दिला. 

Jalna Farmer
भिवंडीत अग्नितांडव! कापूर, अगरबत्तीच्या कंपनीसह कारखान्याला आग

या शेतकऱ्यांवर कर्ज होतं, अशी माहितीसमोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यावर कर्ज होतं आणि या विवंचनेत शेतकरी होता. त्यातून त्याने अखेर प्रचंड तणावाखाली येऊन आपली जीवनयात्रा संपवली. कोंडीबा गव्हांडे यांच्या आत्महत्येमुळे गव्हांडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर आणखी एका शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांतली शेतकरी आत्महत्यांची आकडेवारीही चिंताजनक आहे.

भोकरदन पोलिसांनी केला पंचनामा

कोंडीबा गव्हांडे यांची गोद्री शिवारात शेती आहे. यंदा पिकं जोमात आली होती मात्र, अतिवृष्टीमुळं सर्व काही उद्धवस्थ झालं. त्यामुळं आता बँकेचं आणि खाजगी सावकरांचं कर्ज कसं फेडायचं या विवंचनेत कोंडीबा गव्हांडे होते. त्यामळं आज सकाळी त्यांनी शेतातल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेची भोकरदन पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.

अवकाळी पाऊस, नापिकी, पिकाला मिळणारा भाव अशा अनेक कारणांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त झाला आहे. दुहेरी फटका बसलेल्या शेतकऱ्यावर आधीच कर्जाचा भार असताना कर्ज फेडायचं? संसाराचा गाडा हाकायचा? की शेतीवर लक्ष केंद्रीत करायचं? असा प्रश्न पडला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com