Jalna News
Jalna NewsSaam tv

Jalna News: कोळपणीचे काम सुरु असतानाच दोन्ही बैलांचा मृत्यू; तारात विदूत प्रवाह उतरला असल्याने लागला शॉक

Jalna News : कोळपणीचे काम सुरु असतानाच दोन्ही बैलांचा मृत्यू; तारात विदूत प्रवाह उतरला असल्याने लागला शॉक

जालना : शेतकरी कपाशीच्या शेतात कोळपणीचे काम करत होता. या दरम्यान शेतात असलेल्या (Jalna News) विद्युत वाहिनीच्या पोळला ताण देण्यासाठी लावलेल्या तारात विद्युत प्रवाह उतरलेला होता. या तारेला स्पर्श झाल्याने कोळपणी करत असतानाच दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. ही घटना जालना जिल्ह्यातील (Bhokardan) भोकरदन तालुक्यातील तळेगाव वाडी शिवारात घडली. (Breaking Marathi News)

Jalna News
Gauri Ganesh Festival: मुस्लिम कुटुंबीय जपतेय परंपरा; वीस वर्षपासून साजरा करताय गौरी गणपती सण

भोकरदन तालुक्यातील तळेगाव शिवारात शेतकरी शिवाजी चव्हाण यांच्या कपाशीच्या शेतात कोळपणीचे काम सुरु होते. शेतातून गेलेल्या महावितरणच्या (Mahavitaran) तानाच्या तारात विद्यूत प्रवाह उतरल्याने शॉक लागून २ बैलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. आज दुपारी एकच्या सुमारास शिवाजी चव्हाण हे आपल्या शेतात कापशी कोळपनीच काम करत असताना शेतात असलेल्या विद्युत पोलच्या पोल तानाचा ताराला त्यांच्या बैलाचा स्पर्श झाला. ताणात विदूत प्रवाह उतरल्याने दोन्ही बैलांना शॉक (Electric Shock) लागल्याने दोन्ही बैल जागीच कोसळले.  

Jalna News
Ramdas Athawale News: एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री राहणार; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान

नुकसान भरपाईची मागणी 

यावेळी चव्हाण यांनी आरडाओरड केली. मात्र शेतात कुणीच नव्हते. तोपर्यंत बैलांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याने शेतकऱ्याचे एक लाखाचे नुकसान झालं आहे. या बाबत सरपंच यांनी घटनेची माहिती महसूल विभागाला आणि महावितरण कंपनीला दिली असून घटनेचा पंचनामा करून शेतकऱ्याला नुकसान भरपाईची मागणी त्यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com