वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांची अडवणूक; स्‍वाभिमानी संघटनेचा रास्‍ता रोको

वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांची अडवणूक; स्‍वाभिमानी संघटनेचा रास्‍ता रोको
वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांची अडवणूक; स्‍वाभिमानी संघटनेचा रास्‍ता रोको
वीजबिल

जालना : विजबिलासाठी महावितरणकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. वीज कनेक्‍शन तोडले जात आहेत. या विरोधात तसेच शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा धाकलगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. (jalna-news-Obstruction-of-farmers-for-recovery-of-electricity-bills-Stop-the-road)

वीजबिल
चक्‍क दारु दुकान परवानगीसाठी ग्रामसभेत पाच अर्ज

ऐन रब्बी हंगामात महावितरणने शेतकऱ्यांकडे थकीत असलेल्या वीजबिल वसुलीसाठी तगादा लावत शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्यास सुरुवात केली आहे. महावितरणने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करणे थांबवावे; या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जालन्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अंबड तालुक्यातील धाकलगाव फाट्यावर हे आंदोलन करण्यात आले.

पीकविम्‍याचाही लाभ द्या

आंदोलनादरम्यान स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत शेतकऱ्यांचे तोडलेले विज कनेक्शन पुन्हा जोडण्याची मागणी केली. तसेच शेतकऱ्यांना पीकविमा देण्याचीही मागणी करत घोषणबाजी केली. या मागण्या मान्य न केल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला. दरम्यान आंदोलन करणाऱ्या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com