Jalna: शेतकऱ्यांना एका हाताने द्यायचे दुसऱ्या हाताने मात्र खोडा; एफआरपीवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप

आयोगाच्या या निर्णयाला केंद्रीय अर्थविषयक समितीने ही मंजुरी दिली आहे.
Jalna News
Jalna NewsSaam Tv

जालना - कृषिमूल्य आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार या वर्षीच्या साखर हंगामात एफआरपी मध्ये प्रतिटन १५० रुपये वाढ करण्यात आली आहे. आयोगाच्या या निर्णयाला केंद्रीय अर्थविषयक समितीने ही मंजुरी दिली आहे. त्यामुळे या वर्षी प्रतिटन उसाला २९०० रुपया वरून ३०५० रुपये दर शेतकऱ्यांना (Farmer) मिळणार आहे.

केंद्र सरकारने (Central Government) एकीकडे एफआरपीत वाढ जरी केली असली तरी दुसरीकडे साखर उताऱ्याचा बेसही १० टक्के हुन १०.२५ केला आहे. त्यामुळे सरकार एकीकडे १५० रुपय भरघोस वाढ केल्याचं सांगत असलं तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याला ७५ रुपये इतकाच वाढ मिळणार असल्याने सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून केल्या जाऊ लागला आहे.

हे देखील पाहा -

एफआरपी मध्ये वाढ करत असताना कृषिमूल्य आयोगाने उसाचा वाढलेला उत्पादन खर्च,खतांचे वाढलेले दर मशागतीसाठी येणारा खर्च विचारत घेऊन जरी उसाच्या प्रतिटन दरात १५० रुपये वाढीची शिफारस केली असली तरी प्रत्यक्षत मात्र उत्पादन खर्चाच्या तुलनेत ही शिफारस फारच तोकडी केंदीय अर्थ समितीने शिफारस स्वीकारताना ‘एफआरपी’चा मूळ बेस मात्र वाढवून शेतकऱ्यांना एका हाताने दिलासा देताना दुसऱ्या हाताने त्यांना मिळणाऱ्या मोबदल्यात खोडा घातला असल्याचा आरोप देखील केला जात आहे.

२००९-१० ते २०१७-१८ पर्यंत साखर उतारा ९.५० % गृहीत धरूनच एफआरपी निश्‍चित केली जात होती.मात्र २०१८-१९ च्या हंगामात पहिल्यांदा एफआरपी दरात वाढ करताना उतरा दहा टक्के निश्‍चित केला होता. गेली तीन वर्षाच्या काळात हाच उतारा ग्राह्य धरून ‘एफआरपी’त वाढ झाली.गेल्या तीन हंगामात ‘एफआरपी’त प्रतिटन सुमारे ३०० रुपयांची वाढ झाली आहे.अस असलं तरी साखरेच्या विक्री दरात मात्र कोणत्याही प्रकारची वाढ नाही,केंद्र सरकारने १४ फेब्रुवारी २०१९ ला साखर विक्रीचा कायदा केला.

Jalna News
खड्डा चुकविण्याच्या नादात २ ट्रकची समोरासमोर धडक; चौघांचा जागीच मृत्यू

साखरेची विक्री दर प्रतिक्विंटल ३१०० रुपये निश्‍चित केले. या पेक्षा कमी दराने साखर विक्री करणे गुन्हा ठरवून संबंधितांवर कायदेशीर कारवाईची तरतूद केली-मात्र दुसरीकडे शेतकऱ्याला एका हातानी एफआरपी दिलासा दिला मात्र दुसऱ्या हातानी खोडा घालण्याचं काम केंद्र सरकारने केला असल्याचाआरोप स्वाभिमानी शेतकरी संघटने केला आहे.

म्हणजे पूर्वी २०२१-२२ गाळपात १०% साठी २९०० रुपये दिल्या जात होते आत्ता २०२२-२३ गाळपात १०% साठी २९७५.६० रुपये दिले जाणार आहेत. १०% बेस वर जरी विचार केला तर शेकऱ्याच्या हातात ७५ रुपये प्रतिटन FRP वाढीव मिळणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com