लातूर बाजारात नवीन तुरीची आवक; ६५०० रुपयांचा दर

सोमवारी २ हजार ५४२ क्विंटलची आवक झाली. त्याला ६ हजार ८६८ रुपय कमाल, ५ हजार ८४२ रुपयांचा किमान तर ६ हजार ५०० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला. दरम्यान, नवीन तुरीच्या तुलनेत जुन्या तुरीचा दर १०० ते २०० रुपयांनी जास्त आहे.
Latur Agricultural Produce Market Committee
Latur Agricultural Produce Market Committeeदीपक क्षीरसागर

लातूर - येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural Produce Market Committee) खरीप हंगामातील तुरीची आवक होत असून, सोमवारी २ हजार ५४२ क्विंटलची आवक झाली. त्याला ६ हजार ८६८ रुपय कमाल, ५ हजार ८४२ रुपयांचा किमान तर ६ हजार ५०० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला. दरम्यान, नवीन तुरीच्या (Pigeon pea) तुलनेत जुन्या तुरीचा दर १०० ते २०० रुपयांनी जास्त आहे. (Latur Agricultural Produce Market Committee News)

हे देखील पहा -

जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात सोयाबीननंतर (Soyabean) तुरीचा सर्वाधिक पेरा होता. मात्र पाऊस आणि अतिवृष्टीमुळे तुरीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला. काही ठिकाणी तर तुरीचा खराटा झाला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी फवारणी करीत तूर जगविली आहे. त्यामुळे चांगला दर मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. सध्या बाजारात अडीच हजार क्विंटलची दररोज आवक होत असून, दरही ६ हजार ५०० रुपयांचा मिळत आहे. तर जुन्या तुरीला यापेक्षा १०० ते २०० रुपयांचा वाढीव भाव आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com