Latur: 'लम्पी'चा धोका वाढला! सहा दिवसात चार पशुधन दगावले

पशुपालकांनी आपल्या पशुधनाची काळजी घेण्याबरोबरच त्यांचे लसीकरणही करणे आवश्यक आहे.
Lumpy Skin Disease
Lumpy Skin Diseasesaam tv

लातूर - जिल्ह्यात गेल्या २० दिवसात आठ तालुक्यातील ४० गावातील ३०२ पशुधन लम्पीच्या (Lumpy Disease) आजाराने वाघीत झाले आहेत. पशुधनावर झालेल्या उपचारानंतर ४८ पशुधन बरे झाले. तर निलंगा तालुक्यातील दोन गाय, एक बैल व एक कालवड लम्पीच्या आजाराने गेल्या सहा दिवसात दगावले आहेत. जिल्ह्यात पशुधनामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत असून पशुपालकांनी आपल्या पशुधनाची काळजी घेण्याबरोबरच त्यांचे लसीकरणही करणे आवश्यक आहे. (Lumpy Skin Disease)

Lumpy Skin Disease
Congress : कॉंग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस; राहुल गांधींच्या अध्यक्षपदाला चव्हाणांचा विरोध

लम्पीच्या आजाराचा जिल्ह्यात सर्वाधिक प्रादुर्भाव निलंगा तालुक्यातील पशुधनास झाला आहे. लातूर, औसा, अहमदपूर, उदगीर, रेणापूर, चाकूर, देवणी तालुक्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढत आहे. निलंगा तालुक्यातील कासार सिरशी व उस्तुरे येथे चार पशुधन लम्बीने दगावले आहेत.

लातूर जिल्ह्यात ३१ ऑगस्ट रोजी पहिले लम्पी बाधीत पशुधन निदर्शनास आले. नंतर टप्याटप्याने १९ सप्टेंबर हा आकडा ३०२ पर्यंत पोहचला. जिल्हयातील १० तालुक्यापैकी ८ तालुक्यातील ४० गावात लम्पीच्या आजाराने दिवसाला सरासरी १५ पशुधन बाधीत होत आहेत. गेल्या सहा दिवसात निलंगा तालुक्यातील कासर सिरसी येथील १ गाय १ बैल व १ कालवड तर उस्तूरी येथील १ गाय लम्बीने दगावली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com