सोयाबीनचे दर पोहोचले ६ हजार ८५० वर

सोयाबीनचे दर पोहोचले ६ हजार ८५० वर
सोयाबीनचे दर पोहोचले ६ हजार ८५० वर
soyabean price

लातूर : लातूरच्या आडत बाजारात ५ ऑगस्टला सोयाबीनला १० हजार ६०१ प्रतिक्विंटल दर मिळाला. त्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी या वर्षात सोयाबीन दर ५ हजार ३०७ रूपयांच्या खाली उतरला होता. परंतु, २२ नोव्हेंबरला आडत बाजारात १३ हजार ४११ क्विंटल सोयाबीनची आवक होऊन प्रतिक्विटल ६ हजार ८५० रूपये दर मिळाला. सोयाबीनच्या दरात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. (latur-news-bajar-sameeti-Soybean-prices-reached-6850-per-Quintal)

soyabean price
धक्‍कादायक..कर्मचाऱ्यांनीच फोडली बँक; तारण ठेवलेले दोन कोटींचे दागिने लंपास

लातूरच्या आडत बाजारात यावर्षी १३ एप्रिल रोजी ७ हजार ३०७ क्विंटल सोयाबीनची आवक होऊन ७ हजार २९ रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. १९ मे रोजी ४ हजार २५ क्विंटल आवक होऊन ७ हजार ५७१ रूपये प्रतिक्विंटल दर मिळला. जून महिन्‍यात दरात ५०० रूपयांपर्यंत घसरण झाली होती. तर ३० जुलैला ३ हजार १७१ क्विंटल सोयाबीनची आवक होऊन ९ हजार ८५१ रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

ऑगस्‍टमध्‍ये विक्रमी दर

लातूरच्या आडत बाजारात ५ ऑगस्टला ३ हजार १३५ क्विंटल सोयाबीनची आवक होऊन य वर्षाचा सर्वाधिक १० हजार ६०१ रूप प्रतिक्विंटल दर मिळाला. तर ९ नोव्हेंबर रोजी या वर्षा सोयाबीनचा दर ५ हजार ३०७ रूप पर्यंत उतरला होता. २ नोव्हेंबर रोजी आडत बाजारात १ हजार ४११ क्विंटल सोयाबीनची आव होऊन प्रतिक्विंटल ६ हजार ८५० रूप दर मिळाला. यावर्षी अतिवृष्टीम सोयाबीनच्या उत्पादनात घट झा असल्याने दरात आणखी वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com