शेतकऱ्याची प्रकृती खालवली, निलंगेकर चिंतेत; सरकारने लक्ष द्यावे

latur
latur

लातूर : लातुर जिल्ह्यात झालेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी लातुर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात एका शेतकऱ्याची प्रकृती खालावल्याने त्यास उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. काशिनाथ गरिबे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. latur-sambhaji-patil- nilangekar-farmers-agitation-maharashtra-government-sml80

latur
काेणी मारली बाजी, यशाेमती ठाकूर की बच्चू कडू; जाणून घ्या

लातुर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात साेमवारपासून आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली आमदार रमेश कराड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्यासह ७२ शेतक-यांनी मागण्यांच्या पुर्तसेसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

शेतकऱ्यांचा आक्रोश राज्य शासनाच्या दरबारात पोहचवण्यासाठी हे आंदोलन आजही सुरू हाेते. या अन्नत्याग आंदोलनात आज (मंळवार) काशिनाथ गरीबे या शेतकऱ्याची प्रकृती बिघडली. त्यास तातडीने रुग्णालयात नेहून त्यावर उपचार सुरू केले आहेत अशी माहिती आंदाेलकांनी दिली.

दरम्यान हे आंदाेलन सुरुच राहील. शेतक-यांचा जीव जाण्यापर्यंत राज्य शासन थांबणार का असा प्रश्न उपस्थित करुन आता तरी राज्य शासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी आमदार संभाजी पाटील निलंगेकर sambhaji patil nilangekar यांनी केली आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com