Sangli News : द्राक्ष उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात, अवकाळी पावसात बेदाणा भिजला

राज्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना भरपाई द्यावी अशी मागणी जाेर धरु लागली आहे.
raisin, sangli, grapes, farmers, unseasonal rain
raisin, sangli, grapes, farmers, unseasonal rainsaam tv

Loss Of Raisin In Sangli : राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (unseasonal rains) सांगली (sangli) आणि साेलापूर (solapur) जिल्ह्यात द्राक्ष उत्पादकांना माेठा ताेटा सहन करावा लागत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे सांगली जिल्ह्यातून यंदा 14 हजार टनाच्या आसपास द्राक्षाची (grapes) निर्यात झाली असताना दुसरीकडे निर्यातीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना आलेल्या अवकाळी पावसाने शिल्लक राहिलेल्या द्राक्ष बागायतदार आणि बेदाणा (raisin) उत्पादकाची चिंता वाढवली आहे. (Maharashtra News)

raisin, sangli, grapes, farmers, unseasonal rain
Maratha Reservation News : मराठा समाजाची राज्य सरकारवर भिस्त; आरक्षणाच्या याचिकेवर SC त आज सुनावणी

योग्य दर न मिळाल्याने अजून सांगली जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या द्राक्षबागाची निर्यात झाली नाही. त्यामुळे एकीकडे दर नाही आणि दुसरीकडे चार दिवसांपासून अस्मानी संकट निर्माण झाल्याने द्राक्षचे नुकसान होत आहे.

raisin, sangli, grapes, farmers, unseasonal rain
Christian Community Morcha News : अन्यायाच्या विराेधात ख्रिस्ती समाज एकवटला; उद्या आझाद मैदानावर महामोर्चा

दुसरीकडे बेदाणा करण्यास टाकलेली द्राक्षे देखील झालेल्या पावसाने खराब होऊ लागली आहेत. त्यामुळे सध्या दुहेरी संकटात द्राक्ष उत्पादक शेतकरी अडकला आहे. शासनाने तातडीने लक्ष देत द्राक्ष उत्पादक शेतकरी यांनी मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा राजाराम पवार यांनी व्यक्त केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com