तुरीचे उत्पादन कमी; शेतकरी संकटात

तूर पीक संकटात आल्याने शेतकरी आता आर्थिक संकटात सापडले आहेत.
तुरीचे उत्पादन कमी; शेतकरी संकटात
तुरीचे उत्पादन कमी; शेतकरी संकटातSaam Tv

लातुर - जिल्ह्यात चालू वर्षी सोयाबीन पिकांचं नुकसान झालं तर आता तूर पीक संकटात आल्याने शेतकरी आता आर्थिक संकटात सापडले आहेत कृषी विभागाने प्राथमिक सर्व्हे सुरू केले असले तरी केवळ विमाधारक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल पण अन्य शेतकऱ्यांना शासनाच्या आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.

लातुर जिल्हा हा तसा सोयाबीनच कोठार अशी ओळख आहे जिल्ह्यातील 6 लाख हेक्टर क्षेत्रापैकी किमान साडेचार लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीन तर 80 हजार हेक्टर क्षेत्रात तूर पिकांचं उत्पादन घेतले जाते चालू वर्षी सप्टेंबर अखेर अतिवृष्टीमुळे सोयाबीन हातचे वाया गेले आता मागील आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे बुरशीचा मोठा धोका झाला.

हे देखील पहा -

यात तुरीला मोठ्या प्रमाणात फुलगळ झाली शेंगात दाणे अत्यंत अल्प भरले असल्याने जितकं बियाणं पेरलं तितकं निघेल की नाही याची शाश्वती देखील शेतकऱ्यांना नाही. सध्याला कृषी विभागाने प्राथमिक सर्व्हे सुरू केला असता तरी 50 % पेक्षा जास्त प्रमाणात नुकसान झाली असेल तर ज्या शेतकऱ्यांन पीकविमा भरला त्यांना विम्यातून पैसे मिळू शकतात अस लातूरचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी डॉ. एस डी गावसाने यांनी सांगितले आहे.

लातुर जिल्ह्यात सोयाबीन तूर आणि ऊस या नगदी पिकातून शेतकऱ्यांना चार पैसे हाती मिळतात पण आता बुरशीजन्य रोगाचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धोका झाल्याने वकुंच उत्पादनात मोठी घट येणार असल्याची स्थिती आहे. यासाठी ज्या शेतकऱ्यांनी तूर पिकाचा विमा भरला नाही त्यांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे आता राज्य शासनाने या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

तुरीचे उत्पादन कमी; शेतकरी संकटात
नंदुरबारमध्ये हुडहुडी; तापमानाचा पारा घसरला

एकूणच निसर्गाचा लहरीपणामुळे दुष्काळी सावली असलेल्या लातुर जिल्ह्यातील सोयाबीन आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना शेतमाल उत्पादनातून दिलासा मिळाला नाही आता या शेतकऱ्यांच्या नजरा अपेक्षेने राज्य शासनाकडे लागल्या आहेत मायबाप सरकार यावर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com