महा ई-सेवा केंद्राचा कारनामा; शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बिबराळ येथील महा ई-सेवा केंद्र चालकांनी पिक विमा भरलेल्या रकमेत बिबराळ व बाकली येथील सुमारे चारशेहून अधिक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.
महा ई-सेवा केंद्राचा कारनामा; शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक
महा ई-सेवा केंद्राचा कारनामा; शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूकदीपक क्षीरसागर

दीपक क्षीरसागर

लातूर : लातूर Latur जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बिबराळ येथील महा ई-सेवा केंद्र Maha e Seva Kendra चालकांनी पिक विमा भरलेल्या रकमेत बिबराळ व बाकली येथील सुमारे चारशेहून अधिक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. असून त्या केंद्र चालकावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शंभराहून अधिक शेतकऱ्यांनी शिरूर अनंतपाळ चे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

हे देखील पहा-

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बिबराळ आणि बाकली येथील शेतकऱ्यांनी बिबराळ येथील नितीन भानुदास ऐरोळे यांचे महा ई सेवा केंद्र आहे. याच महा ई सेवा केंद्रातून 400 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पिक विम्याची रक्कम भरणा केली. आणि भरलेल्या रकमेची पावती पण घेतली मात्र दोन महिन्याच्या कालावधीनंतर भरलेली रक्कम व ऑनलाईन ॲप द्वारे दाखवत असलेली रक्कम यात बरीच तफावत दिसून आली. त्यामुळे शेतकऱ्यांनी Farmers संताप व्यक्त केला.

महा-ई-सेवा केंद्र चालकांनी पूर्ण विम्याची रक्कम न भरताचं आपली फसवणूक केल्याचे लक्षात आले. भविष्यात पीक विमा मंजूर झाला तर होणाऱ्या लाभापासून चारशेहून अधिक शेतकरी वंचित राहतील या सर्वस्वी ही सेवा केंद्र चालक जबाबदार असून त्याची ताबडतोब चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा सामूहिक उपोषण करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. तर पैश्यांची फसवणूक करणारा आरोपी सध्या फरार आहे.

महा ई-सेवा केंद्राचा कारनामा; शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक
Ahmednagar: महिला सरपंचास मारहाण; 8 जणांविरोधात गुन्हा दाखल

या निवेदनावर बाबुराव शिंदे प्रभावती अशोक पवार गुणवंत रक साळी सत्यवान शेळके इंद्रजीत हारगे दिलीप घारोळे यासह अन्य शेतकऱ्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. याबाबत शिरूर अनंतपाळचे तहसीलदार अतुल जताळे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अंगद सुडके यांनी चौकशी सुरू असून त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाईल असे सांगितले.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com